WhatsApp वाढदिवस


२४ फेब्रुवारी व्हॉट्सअपचा वाढदिवस.
जेन कॉम याने २४ फेब्रुवारी

२००९ रोजी व्हॉट्सअप INC. या नावाने एक कंपनीची स्थापना केली.
हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अप्प्लिकेशन आहे. आज प्रत्येक मोबाईल मध्ये दुसरे कोणते अप्लिकेशन असो किंवा नसो पण व्हॉट्सअप हमखास बघायला मिळते. आज जगभरात १०० कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्हॉट्सअप चा उपयोग करतात. व्हॉट्सअप याचा इंग्लिश मध्ये अर्थ काय सुरु आहे? या पाश्चिमात्य देशातील प्रसिध्द शब्दामुळे त्यामुळे व्हॉट्सअप हे नाव या अप्लिकेशनचे ठेवण्यात आले.

व्हॉट्सअप  वापरणारे जगात सर्वाधिक लोक भारतात आहे. व्हॉट्सअप टीम मध्ये ५५ इंजिनियर काम करतात. यामध्ये एक इंजिनियर १ करोड ८० लाख वापरकर्त्यांना हॅन्डल करतो. व्हॉट्सअप वर रोज ४३०० करोड मेसेज सेंड होतात. व्हॉट्सअप वर रोज शेअर होणाऱ्या फोटोची संख्या १६० करोड एवढी आहे आणि व्हिडीओ ची संख्या २५ करोड एवढी आहे.

व्हॉट्सअप चा वापर आपण ५३ भाषामध्ये करू शकतो. व्हॉट्सअपचे महिन्याला अॅक्टीव वापरकर्ते १०० करोड आहे जे फेसबुक मेसेंजर पेक्षाही अधिक आहे. व्हॉट्सअप वर ग्रुपची संख्या १०० करोड पेक्षाही अधिक आहे.
व्हॉट्सअप ने स्वतःच्या प्रसिद्धी करिता जाहिरातीवर रुपया सुध्दा खर्च केला नाही तरी ते एवढे लोकप्रिय आहे.

जगात स्रावाधिक डाऊनलोड  होणाऱ्या अॅप पैकी व्हॉट्सअप हे ५ व्या नंबरवरील अॅप आहे.

व्हॉट्सअप “नो अॅड पॉलीसी” वर काम करतो त्यामुळे व्हॉट्सअप वर तुम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात दिसत नाही. 

मी स्वत: रोज २०० हून अधीक ग्रूप वरती गेले दोन वर्षे रोज संगीत, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस, आरोग्य, दिन विशेष, पदार्थ या विषयावर माहिती शेअर करत असतो. मी अंदाजे व्हॉट्सअप व फेसबुक मिळून ४०००० लोकांना शेअर करतो.

व्हॉट्सअपचा इतिहास.
व्हॉट्सअप ची सुरवात जेन कॉम याने केली. जेन कॉम यांचा जन्म युक्रेन देशातील किंवा या छोट्याश्या गावी झाला. त्यांची आई एक गृहिणी आणि वडील एक मजदूर होते. त्याकाळी युक्रेन देशामध्ये राजकीय परिस्थिती हि खूप ठीक नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी तिथून अमेरिकेत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचे आईवडील सगळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरात राहायला आले. तिथे त्यांच्या आईवडिलांनी छोटी मोठी कामे करून घरचा आणि जेन यांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. जेम कॉम यांना लहानपणापासूनच कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये खूप रस होता. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना कम्प्युटर विकत घेणे परवडत न्हवते. १९ व्य वर्षी त्यांनी पैसे जमा करून स्वतः साठी एक कॉम्पुटर विकत घेतला आणि आपल्या घराजवळील लायब्ररीमधून प्रोग्रँमिंग ची पुस्तके आणून घरच्या घरी प्रोग्रामिंग शिकू लागले. यानंतर त्यांनी कॉम्पुटर सायन्स मधून आपली डिग्री पूर्ण केली आणि एक कंपनी मध्ये सिक्युरिटी टेस्टर च्या पदावर काम करू लागले. १९९७ मध्ये याहू या कंपनीत त्यांना इन्फ्रास्ट्रक्ट्चर इंजिनियर या पदावर नोकरी मिळाली. तिथे त्यांची ओळख ब्रायन अक्टन यांच्याशी झाली दोघांनी मिळून ९ वर्ष याहू कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर फेसबुक मध्ये नोकरी करूयात असा ठरवून याहू च्या नोकरीचा राजीनामा दिला. परंतु फेसबुक मध्ये नोकरीसाठी आवेदन दिल्यानंतर त्यांना तिथे रिजेक्त करण्यात आले. दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची कंपनी सुरु करू असे दोघांनी ठरवले. आणि त्या हिशेबाने पैसे जमवायला सुरुवात केली. त्यावेळी अॅपल कंपनीने त्यांचा पहिला आयफोन बाजारात आणला होता, परंतु त्यात आपल्या नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवणे हे खूप खर्चिक होते. याचवेळी त्यांना व्हॉट्सअप ची कल्पना सुचली आणि दोघांनी मिळून व्हॉट्सअप हे नवीन मेसेजिंग अँप बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला याहू मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या काही मित्रांनी मिळून कंपनी साठी अडीच लाख डॉलर्स चा फंड गोळा केला आणि २४ फेब्रुवारी २००९ ला व्हॉट्सअप INC. या नावाने एक कंपनी ची स्थापना केली.

व्हॉट्सअप चा सुरुवातीचा कळलं हा खूप कठीण होता त्यांनी जवळच एक ऑफिस कंपनीसाठी भाड्याने घेतले. तिथे हिटर ची व्यवस्था नसल्याने ते आणि त्यांचे सहकारी ऐन थंडीत दिवसातील १६ तास काम करायचे. सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअप चा इन्कम महिन्याला फक्त ५००० डॉलर्स इतकाच होता. परंतु २०११ जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी आपले व्हॉट्सअप लाँच केले तेव्हा त्यांचा इन्कम २ वर्षात २० पटीने वाढला आणि त्यांचे अँप Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अँप बनले. २०१४ मध्ये व्हॉट्सअप चा प्रभाव एवढा वाढला कि फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजर ची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली. यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी २०१४ मध्ये जेन कॉम यांच्याशी संपर्क करून व्हॉट्सअप ला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेन कॉम याना मार्क यांचा हा प्रस्ताव आवडला. यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी १९ बिलियन डॉलर्सला व्हाट्सअप खरेदी केले आणि जेन कॉम आणि ब्रायन अक्टन यांना कंपनीचे शेयर्स देऊ केले. जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा मनाला जातो.

SHARE THIS

->"WhatsApp वाढदिवस"

Search engine name