पंतप्रधान सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन योजना

1.     पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
2.     प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
3.     योजनेविषयी महत्वाचे
भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक योजना खेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असा अनेकांचा समज आहे. मात्र शासन राबवित असलेल्या जनहिताच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती, उद्योजक तसेच सामान्य नागरिकांनासुद्धा निश्चितच चांगले दिवस येत असल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान सुरक्षा योजना, जीवन ज्योती विमा योजना तसेच अटल पेन्शन योजना राबविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला.
या योजना देशातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.9 मे 2015) खुल्या केल्या असून कोलकाता येथे याचा लोकार्पण सोहळा साजरा झाला तर महाराष्ट्रात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.


सामान्य, गोर-गरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने 1 जून 2015 पासून संपूर्ण देशभर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. या योजनातील लाभार्थ्यांची नोंदणी 1 मे 2015 पासून सुरु झाली आहे तर प्रत्यक्ष योजना 1 जून 2015 पासून अंमलात येणार आहे.

आपण या तिन्ही योजनेविषयी थोडक्यात माहिती घेऊया.



पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
योजनेचा तपशील:

केवळ 12 रूपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. दरवर्षी नुतनीकरण आवश्यक. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल. 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकांद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नुतनीकरणाचा अर्ज 31 मेपर्यंत देणे आवश्यक राहील.

सहभाग कालावधी:

या योजनेत विमा संरक्षण हे 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षासाठी राहील. दरवर्षी 31 मेपर्यंत प्रीमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत ही 31 ऑगस्ट 2015 ही पहिल्या वर्षासाठीच राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत (31 नोव्हेंबर 2015) वाढवू शकते. नवीन विमा घेणाऱ्याला पुढच्या वर्षी सामील होता येणार आहे.
अपघात विमा भरपाई:
फायद्याचा तक्ता
मिळणारी विमा रक्कम
अपघाती मृत्यू
दोन लाख रूपये
दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पायांचा वापर करण्याची क्षमता गमावणे. किंवा एका डोळ्याची आणि एका पायाचीकिंवा एका हाताचा वापर करण्याची क्षमता गमावणे.
दोन लाख रूपये
एका डोळ्याची पूर्ण आणि परत येऊ न शकणारी नजर किंवा एक हात वा एक पाय गमावणे.
एक लाख रूपये

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
योजनेचा तपशील
केवळ 330 रूपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक विमा योजना आहे. कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना एलआयसी किंवा इतर जीवन विमा कंपन्यांमार्फत देऊ केली जाईल. दरवर्षी नुतनीकरण आवश्यक आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल. 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकांद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नुतनीकरणाचा अर्ज 31 मेपर्यंत देणे आवश्यक राहील.

सहभाग कालावधी:

या योजनेत विमा संरक्षण हे 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षासाठी राहील. दरवर्षी 31 मे किंवा त्यापूर्वी कधीही प्रीमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत ही 31 ऑगस्ट 2015 ही पहिल्या वर्षासाठीच राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत (31 नोव्हेंबर 2015) वाढवू शकते. नवीन विमा घेणाऱ्याला पुढच्या वर्षी सामील होता येणार आहे.


योजनेविषयी महत्वाचे
उशिरा नोंदणी करणारे किंवा 31 नोव्हेंबरनंतर नोंदणी करतील त्यांना संपूर्ण वार्षिक प्रीमियम भरून विहीत नमुन्यात स्वत:चे आरोग्य चांगले असल्याबद्दचा दाखला सादर करावा लागेल.तसेच कोणत्याही वेळी या योजनेतून बाहेर पडलेल्या व्यक्तिंना पुन्हा योजनेत सामील व्हायचे असेल तर विहीत नमुन्यात स्वत:चे आरोग्य चांगले असल्याबद्दचा दाखला सादर करावा लागेल. शिवाय नोंदणी तारखेनंतर किंवा पूर्वी विमाधारकाला कोणताही गंभीर आजार नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर या योजनेत सहभागी होता येणार नाही.
शिवाय आपले विमा संरक्षण आपोआप संपुष्टात येईल. तथापि, योजनेत सहभागी झाल्यानंतर आणि वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यानंतरही विमाधारकाला योजना पुढे सुरु ठेवण्याची इच्छा असल्यास विमाधारक त्याच्या वयाच्या 55 वर्षापर्यंत योजनेतील हप्ते भरून विमा संरक्षण वाढवू शकतो.
विमाधारकाचा कुठल्याही कारणाने 55 वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रुपयांची विमा भरपाई मिळेल. संयुक्त नावाने बचतखाते असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेत सहभाग घेता येईल. विमाधारकाने दोन ठिकाणी विमा भरला असेल तर कोणत्याही एका ठिकाणचाच लाभ मिळेल व प्रीमियम परत मिळणार नाही.विमा भरपाई:
फायद्याचा तपशील
मिळणारी विमा रक्कम
विमा धारकाच कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास
    दोन लाख रूपये

अटल पेन्शन योजना
शासकीय नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, काही परतावा मिळतो. मात्र गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखालील जनता यांना वृद्धापकाळात कोणतीही सोय नव्हती. त्यांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना आणली आहे.
यामुळे वृद्धापकाळात सर्वच नागरिकांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय 2015-16 च्या अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली होती. यामुळे केंद्र सरकारने सर्वसामान्यांना अच्छे दिनआणले आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. योजनेचा तपशीलमुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे संचालित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरणद्वारे नियमित केले जाते.ही योजना 1 जून 2015 पासून कार्यान्वित होत आहे.
पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून पेन्शन मिळणार आहे. ही योजना कायम चालू राहील, मात्र पाच वर्षानंतर सरकार कोणतीही रक्कम भरणार नाही.योजनेसाठी सरकारला खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी व त्यावरील व्याज हे परत घेण्यात येईल. वर्गणीदाराला महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे भरता येणार.मात्र हप्ता चुकल्यास बॅंकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल.योजनेसाठी पात्रता या योजनेत 18 ते 40 वर्षांची कोणतीही व्यक्ती सामील होऊ शकते.
ही योजना सर्व बचत बॅंक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे.वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत. योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्डला मुलभूत केवायसी दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून 60 वर्षांच्या आत बाहेर पडता येणार नाही, (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू.)योजनेचे फायदे: जे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल.या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50 टक्के रक्कम जमा करणार आहे.
ही रक्कम सरकार 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षासाठी खात्यावर जमा करेल. सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत. वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार रूपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षांपासून मिळेल. कोणत्याही बॅंक बचत खात्यातून परस्पर रक्कम जमा होऊ शकते. स्वावलंबन योजनेत सहभागी वर्गणीदारांना अटल पेन्शन योजनेत सहभागी होता येणार. या योजनेतून बाहेर पडणाऱ्या वर्गणीदाराला सरकार फक्त 2016-17 पर्यंतच लाभ देईल.वयोमानानुसार अटल निवृत्तीवेतन योजना चार्ट-
सहभागी होण्याचे वय
वर्गणी भरण्याची वर्षे
एक हजार पेन्शन हप्ता
दोन हजार पेन्शन हप्ता
तीन हजार पेन्शन हप्ता
चार हजार पेन्शन हप्ता
पाच हजार पेन्शन हप्ता
18
42
42
84
126
168
210
19
41
46
92
138
183
228
20
40
50
100
150
198
248
21
39
54
108
162
215
269
22
38
59
117
177
234
292
23
37
64
127
192
254
318
24
36
70
139
208
277
346
25
35
76
151
226
301
376
26
34
82
164
246
327
409
27
33
90
178
268
356
446
28
32
97
194
292
388
485
29
31
106
212
318
423
529
30
30
116
231
347
462
577
31
29
126
252
379
504
630
32
28
138
276
414
551
689
33
27
151
302
453
602
752
34
26
165
330
495
659
824
35
25
181
362
543
722
902
36
24
198
396
594
792
990
37
23
218
436
654
870
1087
38
22
240
480
720
957
1196
39
21
264
528
792
1054
1318
40
20
291
582
873
1164
1454
अटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे. एक हजार पेन्शनसाठी 1.7 लाख जमा राशी, दोन हजार पेन्शनसाठी 3.4 लाख रूपये, तीन हजार पेन्शनसाठी 5.1 लाख रूपये, चार हजार पेन्शनसाठी 6.8 लाख रूपये आणि पाच हजार पेन्शनसाठी 8.5 लाख रूपयांची जमा राशी वारसांना मिळणार आहे.
तिन्ही योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18001801111, 18001022636 वर संपर्क करावा किंवाwww.jansuraksha.gov.in or www.financialservices.gov.inया संकेतस्थळाला भेट देता येईल.

संकलन- धोंडिराम अर्जुन.
स्त्रोत : महान्युज



SHARE THIS

->"पंतप्रधान सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन योजना"

Search engine name