Businesses need resources
कोणताही व्यवसाय सुरु करीत असतांना काही मुलभूत गोष्टींचा विचार करावाच लागतो. ज्यामध्ये जमीन (जागा), भांडवल (पैसे), मनुष्यबळ (कामगार), कच्चा माल (जर गरज असेल तर) या संसाधनांचा विचार सर्वात आधी करावा लागतो. त्याचप्रमाणे मार्केटींग (विपणन), जाहिरात, हिशोब ठेवणे या गोष्टीही तितक्याच आवश्यक ठरतात. या संसाधनांचा योग्य वापर करणे हे कोणत्याही व्यावसाईकासाठी आवश्यक गोष्ट ठरते. व्यवसायासाठी योग्य जागा, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उभारणीसाठी पुरेसे भांडवल हाताशी असणे आवश्यक ठरते.
काही काही व्यवसायासाठी कच्च्या मालाची गरज लागत नाही. पण जाहिरात आणि विपणन आवश्यकच ठरते अश्यावेळी ती ती कौशल्य असलेली माणसे बरोबर बालागावीच लागतात. ब-याच वेळा व्यावसाईकाच्या अंगी यातली अनेक कौशल्य असतात किंवा त्याला या सर्व बाबींचे किमान ज्ञान असते. परंतू व्यावसाईकाच्या हातात असलेला वेळ आणि कामे याची सांगड घालणे कठीण जाते त्यावेळी त्याला प्रशिक्षीत मनुष्यबळ बरोबर नोकरीला ठेवावेच लागते.


CAAB74E87B
ReplyDeleteTakipçi Satın Al
M3u Listesi
Para Kazandıran Oyunlar
Dragon City Elmas Kodu
Pubg New State Promosyon Kodu