प्राचीन काळापासून औषधी वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे मानवाच्या वापरत आहेत. आयुर्वेदाने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २००० वनस्पतीमध्ये निरनिराळे आजार बरे करण्याची क्षमता असुन सुमारे १३०० वनस्पती त्यांच्या निरनिराळ्या सुगंध व स्वादासाठी प्रसिद्ध आहेत.
वनौषधी वनस्पतींची वैशिष्ट्ये
o जागतिक पातळीवर वनौषधी वनस्पतींना फार महत्वाचे स्थान आहे.
o वनस्पतीजन्य औषधांचा वापर मोठया प्रमाणावर वाढत असुन काही औषधी वनस्पतींची लागवड शास्त्रीयदृष्ट्या सुरु करण्यात आलेली आहे.
o औषधी वनस्पतीची जागतिक व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे ६० दशलक्ष डॉलरची आहे.
o भारतातून सध्या सुमारे ४५० कोटी रुपयांची वनस्पतीजन्य औषधे विविध देशांमध्ये निर्यात केली जातात.
o औषधी वनस्पतींपासून विविध औषधे व सौदर्य प्रसाधने बनविली जातात.
o मानवी जीवनात औषधी वनस्पतींना अन्यन्यसाधारण महत्व असल्याने औषधी वनस्पतीखालील लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्या देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थिती, जमीन व हवामान यामध्ये असलेली विविधता औषधी वनस्पतीचा लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. वनस्पतीजन्य औषधांमुळे इतर अनिष्ट परिणाम होत नसल्याने त्याचबरोबर औषधी वनस्पतींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणात मदत होताना दिसते. आपल्या देशातून साधारणतः ४० औषधी वनस्पतीची लागवड विविध प्रदेशांमधून केली जाते. आज आपण पहिले तर असे दिसून येते जंगलातून सहजपणे ज्या वनौषधी उपलब्ध होत होत्या त्यांचेही प्रमाण कमी होत चाललेले दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनौषधी प्रजातीची शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
औषधी वनस्पतींच्या क्षेत्रवाढीस भविष्यात चांगला वाव आहे. उत्पादक शेतकरी, खरेदीदार/ उद्दोजक, संशोधन संस्था, वनखाते व विस्तार यंत्रणामधील योग्य तो समन्वय साधून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकास करणेकरिता महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे कार्यरत आहे.


9CBFA057DB
ReplyDeleteSanal Seks
Canlı Cam Show
Ücretli Show