वेळेच्या योग्य वापरासाठी 9 प्रभावी टिप्स 9 Effective Tips For Proper Use Of Time

9 Effective Tips For Proper Use Of Time


                    *वेळेच्या योग्य वापरासाठी 9 प्रभावी टिप्स*

'आता वेळ घालविलात,तर नंतर वेळ तुम्हाला घालवेल',अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. वेळच्या खर्चाविषयी इतके समर्पक दुसरे भाष्य नसावे. आपली ध्येये वा उदिष्ट्ये,त्याकरिता उपलब्ध असणारा वेळ आणि तो वापरायची पद्धती हे त्रैराशिक परिणामकारकरित्या सोडविण्याकरीता एक महत्वाचा घटक म्हणजे खर्च होणाऱ्या वेळेवर नियंत्रण. वेळ फुकट घालविणरया बाह्य घटकांवर आपले नियंत्रण नसले तरी अंतर्गत घटकांवर म्हणजेच आपल्या चुकिच्या मनोवृत्तींवर आपण निश्चितच नियंत्रण आणू शकतो.अशा काही मनोवृत्ती पाहु-


*1.आपण कोणत्याही कामाकरिता केव्हाही उपलब्ध आहोत,असे भासविणे* - भिडेपायी नकार देता न येणे,श्रेय अथवा प्रसिद्धीची हाव, कामाचा नेमका अंदाज बांधता न येणे, झपाट्याने प्रगती करण्याची अवास्तव इच्छा, सगळी कामे स्वतःच करण्याचा हव्यास अशा अनेक संभाव्य कारणांमुळे ही मनोवृत्ती तयार होते. 'सगळ्या गोष्टी साधावयास गेल्यास कोणतीच गोष्ट साध्य होत नाही' हे सूत्र लक्ष्यात ठेवल्यास ही मनोवृत्ती मुळातच निर्माण होणार नाही.

*2. कामाचा शेवट पर्यंत पाठपुरावा न करणे*- यामुळे अनेक छोटी कामे लांबणीवर पडून मोठ्या कार्याचा नाश होऊ शकतो. याकरिता हाती असलेल्या प्रकल्पाच्या ध्येयात छोट्या गोष्टींचाही काळजीपूर्वक विचार करावा.एखादा छोटा स्क्रू नसल्यास संपूर्ण यंत्र बंद पडू शकते याचे भान बाळगावे.

*3.चालढकल करणे*-आळस,उत्साहाचा अभाव,आशा अनेक कारणांमुळे माणसे कामात दिरंगाई करतात.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य आहार,व्यायाम,विश्रांती,उत्साही व्यक्तींच्या संपर्कात राहणे,आशा लहान मोठ्या उपायांनी या मनोवृत्ती वर मात करता येते

*4. कामात अडथळे येऊ न देणे*- बऱ्याच वेळा कामात येणारे अडथळे (उदा. दूरध्वनी,मेसेजेस, भेटावयास येणारी मंडळी इ.) हे आपणास अडथळे असल्याचे लक्ष्यात येत नाही व त्यामुळे हाती घेतलेल्या कामापेक्षा हे अडथळेच माणसाला अधिक महत्वाचे वाटतात. 'जागरूकता' हा यावर एक जालीम उपाय आहे असे म्हंटल्यास तो वावगे ठरु नये.

*5. प्रकल्पांसंबंधी लोकांच्या सूचना वा मतांकडे दुर्लक्ष करणे* - यामुळे कित्तेक वेळा प्रकल्पातल्या अडचणींकडे आपले दुर्लक्ष होते व नंतर त्या अडचणी सोडविण्यात आपला वेळ जातो.

*6. नोंदवही न ठेवणे* - कामाच्यादृष्टीने महत्वाच्या गोष्टींची, वेळांची नोंद ठेवणे अत्यावश्यक असते. ना पेक्षा एकाच वेळी अनेक कामे आपण अंगावर घेतल्याचे आपणास लक्ष्यात येते व 'एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी अवस्था होते.

*7.जनसंपर्कात वाजवीपेक्षा अधिक वेळ दवडणे* - राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, राज्यकर्ते, सनदी अधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांमध्ये ही मनोवृत्ती आढळते. 'राखावी बहुतांची अंतरे' हे असले तरी 'बहुत' म्हणजे किती याचा विवेक बाळगावयास हवा व काही वेळा कटाक्षाने जनसंपर्क टाळावयास हवा.


*8. विश्रांतीची खरी आवश्यकता असणे पण झपाटल्यासारखे काम करत राहणे* - यामुळे खरेतर आपल्या क्षमतेचा ऱ्हास होऊन, कामास अधिक वेळ लागतो. यंत्रालाही विश्रांती, तेलवंगण लागते, मग माणसाचे काय?

*9 केवळ आपल्या 'डोक्यावर' (?) अवलंबून राहणे* - आपल्या स्वतःवर आपला भरोसा निश्चित हवा पण केवळ स्वतःच्या माहितीवर, ज्ञानावर आपण विसंबून राहू नये, बाहेरची मदत जरूर घ्यावी जेणेकरुन आपला वेळ वाचू शकतो.

वेळ खाणाऱ्या या मनोवृत्तीचे भान बाळगणे हाच त्या मनोवृत्ती नाहीशा करण्याचा उत्तम उपाय आहे. वेळ व्यवस्थापनाच्या या विविधांगांची जाणीव झाल्यानंतर त्याविषयी प्रत्यक्ष कृती करणे हेच महत्वाचे आहे.


SHARE THIS

->"वेळेच्या योग्य वापरासाठी 9 प्रभावी टिप्स 9 Effective Tips For Proper Use Of Time"

Search engine name