मागासवर्गीय
मुलींचे
प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी
करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी
१९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील
मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या
दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत
शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने
रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.या
शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी
म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला
आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
शिष्यवृत्तीसाठी अटी
सावित्रीबाई
फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी
च्या मुलींसाठी
असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त
राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना
उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती
दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना
अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

AE331FEF5F
ReplyDeleteTakipçi Satın Al
3D Car Parking Para Kodu
Google Konum Ekleme
Zula Hediye Kodu
Hay Day Elmas Kodu