वडा पाव तयार करून विकणे

माणसाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा भागवण्यासाठी आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना दोन वेळचे वेळेवर जेवण देखील मिळत नाही. परंतू वडा पाव खाल्ला नाही असा माणूस मिळणार नाही. गरीब माणूस व मोठ्यातला मोठा माणूस देखील वडा पाववर दिवस काढतो. त्याच कल्पनेतून बटाटा वडा तयार करून विक्री करणे, हा एक गरजेतून निर्माण झालेला व्यवसाय आहे. आपल्याकडे जागा नाही म्हणून व्यवसाय करायचा नाही का? त्यावर उपाय असा आहे की ज्याच्याकडे ग्राहक आणि जागा आहे परंतू वडा पाव विकत नाहीत. उदा. चहाची टपरी आणि दुकानदार सकाळी चहाला येणाऱ्या ग्राहकांना वडा पाव खायला देऊन दोन पैसे मिळवतील व आपल्यालाही मिळवून देतील.

आर्थिक बाबी उदाहरणार्थ, एक वडा पावची विक्री किंमत रुपये १०/- असून त्यामधील नफा हा रुपये ३/- आहे. वडा पावच्या व्यवसायात दिवसाला फायदा ४०% होतो. उत्पादनानुसार वड्यातील फायदा जास्त किंवा कमी प्रमाणात विभागता येऊ शकतो. दिवसाला वड्याचा उत्पादन खर्च रुपये ३५०/- असून बेसनचे पीठ, बटाटे, मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसून, आलं, तेल, गॅस आदींचा अंतर्भाव असतो. महिन्याला बटाटा वडा पाव उद्योगात उत्पादन खर्च रुपये १०,०००/- आणि खेळते भांडवल रुपये ५,०००/- अशी एकूण रुपये १५,०००/- इतकी गुंतवणूक करावी लागते.
ज्या दुकानदारांनी आपला वडापाव ठेवण्यास उत्सुकता दर्शवली, त्यांच्या संपर्कात रहा. आपल्या मालाबद्दल ग्राहकांची प्रतिक्रीया (रिपोर्ट) आला आहे, याचा अभ्यास करावा. ग्राहकांच्या आलेल्या योग्य त्या सुचनांचा विचार करून उत्पादनामध्ये बदल करावा. मालाचा दर्जा उत्तमरीत्या सांभाळला की व्यवसायाचे अर्धे काम झाले. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वडापाव केंद्रात स्वच्छता असणे आवश्यक आहे. स्वच्छता असल्यास ग्राहक हे वडापाव केंद्रात भेट देण्यास आकर्षित होतात आणि ग्राहक आणि विक्रेत्याचे संबंध दृढ होतात. व्यवसायासाठी असे संबंध फायद्याचे ठरतात

स्थानिक बाजारपेठेत वडापावला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवाशांची ये-जा असणारी ठिकाणे उदा. रेल्वे स्थानक, बस थांबे, कार्यालये, इ. ठिकाणी वडापावची मागणी जास्त असते. सकाळी सकाळी ग्राहकाला वडा पाव पुरवला आणि तो त्याला आवडला की तो त्याचा कायमचा ग्राहक झाला. अशा ग्राहकांमुळे चहा टपरीवाला व दुकानदार आपला माल ठेवण्यास तयार होतो. वडा पावसाठी लागणारा पाव हा बेकरीतून स्वस्तात आणि जास्त प्रमाणावर उपलब्ध होतो.


स्थानिक परिसरातील सामुदायिक कार्यक्रम उदा. महिला मंडळाच्या पार्ट्या, धार्मिक कार्यक्रम, सभा, यांना आपण उपस्थित राहून व्यवसायाची माहिती द्यावी. वडापावचा उद्योग वाढल्यानंतर स्वातंत्र जागा घेऊन वडापाव सेंटर चालू करावे. त्यासाठी लागणारे परवाना (लायसेन्स), आरोग्यविषयक बाबी, अन्न प्रशासनाची योगाची मान्यता, इ. बाबी पूर्ण केल्यास व्यवसायात अडचणी कमी येतात. वडापावशी सलग्न पदार्थ समोसा, मेंदू वडा, कटलेट,पोहे, इत्यादी हळू हळू सुरु करून व्यवसाय वाढवावा.
अशा प्रकारे वड्याची उत्तम सेवा दर्जेदार पद्धतीने दिल्यास ग्राहक वाढतील. ग्राहकांच्या जिभेची चव कायम राखता आली तर वडापाव प्रसिद्ध होऊन व्यवसाय वाढण्यास मदत होईल.

SHARE THIS

->"वडा पाव तयार करून विकणे"

Search engine name