आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिज

*आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे*
=========================


१. डोंगर, जंगल, नदी, चौक, गल्ली, शहर, गांव सगळिकडे मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.

२. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव आहे यावर विश्र्वास ठेवा. (भक्त पुंडलिक)

३. 'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू घेतो. अशा बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची  जास्त काळजी घेणारे आहेत.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.

७. आपण  सर्व जाती-धर्मांचा आदर करा. जातीवादाचे पाप आपण तरी करू नका. धर्मांधांच्या नादी लागु नका.

८. मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या. (महापुरे मोठी झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती)


९. राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोमुळे समाजाचे खूप मोठे नूकसान झालेय. आता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचे कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच).

११. खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा (एकमेका साह्य करा).

१२. नियोजन व काटकसरीने (आहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.

१३. यात्रा, जत्रा, सत्यनारायण, वास्तुशांती, जागरणगोंधळ,लग्न समारंभ डोहाळे(ओटीभरण), पाचवी, बारसे, वाढदिवस बंद करा. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, *एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर साड्या देणे बंद करा* ,यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे 200 रुपयाची साडी आजकाल कोणी घालतच नाही ,कशाला असा खर्च करायचा. पुजार्यांचे व्यवसाय चालविणे बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा.
मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महीलांना मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.

१६. महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा आणि व्यापारी, उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची पुस्तके फेकून द्या व इतिहास, विज्ञानाची पुस्तक हातात द्या.

१७. कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो. पुरोहितगिरीच्या आहारी जाऊ नका. तुमच्या ग्रह- नक्षत्रांची शांति ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि पुरोहितांचे बीना मेहनत रोजगार कमविण्याचे साधन आहे. असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका.
या मुळे आपण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो व त्याचाच फायदा घेतात. माझ्या माहितीतील एक जनाने गुरुजी चे ऐकण्याच्या नादात स्वतः चे घर विकावे लागले. हि पूजा करा तिकडे नारायण नागबली करा,ही शांती करा.

१८. आपण कमविलेल्या पैश्यातुनच आपल्या कुटुंबाला  खुष ठेवा.



Pls forward


SHARE THIS

->"आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिज"

Search engine name