२५ वर्षानंतर पुन्हा गुऱ्हाळाचा अविस्मरणीय अनुभव ! Guerilla Udyojak२५ वर्षानंतर पुन्हा गुऱ्हाळाचा अविस्मरणीय अनुभव !

माझं गाव वागदरी काही दिवसापूर्वी एका लग्न कार्यासाठी गावी जाणे झालं मी एक दिवस आधीच गावी गेलो निमित्त हि अगदी खास होतं माझा अतिशय जवळचा वर्ग मित्र शेतकरी परमेश्वर कणमुसे च्या शेतात अनेक दिवसापासून ऊसाचे 

गुऱ्हाळ सुरू आहे (गावाकडं च्या भाषेत ऊसाचे घाण चालू आहे ) गुऱ्हाळ वर जाऊन पुन्हा एकदा गुळ,ऊसाचे रस इतर माहिती व आंनद घ्यायचं होतं म्हणून मी गावी गेलो होतो २५ वर्षापूर्वी शाळेत असताना वडील पाटल्या च्या शेतावर काम करत असताना 'गुऱ्हाळ 'चा आंनद घेतला होता इतक्या वर्षानंतर पुन्हा मित्रांच्या शेतावर जाणे झालं 

परमेश्वर कणमुसे गावातून दोघेही गप्पागोष्टी करत शेतावर निघालो गावाच्या बाहेर एका मोटार सायकल थांबवून गाडीवर शेताजवळ रोडवर उतरवून पुन्हा शेताकडे निघालो जसजसे "गुऱ्हाळ" भट्टी जवळ आल्यावर तसतसे गुळाचा सुंगध येत होता माझा उत्साह आणि उत्कता वाढत होती कधी एकदा गुऱ्हाळ वर असे होत होतं शेवटी पोचलो तिथे उसाच्या रसाला उकळण्याचे काम मोठ्या कढई सुरू होते व दुसरी कडे 

ऊस क्रशरच्या सहाय्याने त्याचा रस काढला जात होता त्याच बाजूला खास गूळ तयार करण्यासाठी केलेल्या पात्रात ओतलेले होते गूळ साच्यात भरले जात होते मी हे सर्व चित्र मनापासून पाहत असताना मित्र कणमुसे नी माझ्या समोर ऊसाचे ताजे रस काढून त्यात शेतातीलच ताजे लिंबूरस पिळून माझ्या समोर ऊसाचे रसाने भरलेला मग्ग दिला मी क्षणाचा विचार नकरता गटा गटा पिऊन मोकळा झालो 

..अनेकदा उन्हाळ्यात शहरात आपण रस पितो पण इतल्या ताज्या ऊसाचे रस स्वाद गोडवा शब्दांत सांगू शकत नाही ..रस पिण्यासाठी रोज अनेक जण शेतावर गावातील नागरिक व शाळेतील मुले सर्वाना मोफत रस व लिंबू सह पिण्यासाठी मिळते अनेक जण किटलीत रस भरून घेऊन जातात. 

आठवण ( मी सुद्धा लहानपणी असेच घरातून जर्मनची किटली घेऊन रस आणण्यासाठी जायचो त्याची आठवण झाली )...त्यानंतर ऊसा च्या फडातून (गद्दी) बैलगाडीत ऊसाचे अनेक मोळी घेऊन रस काढण्याचा क्रशरचा ठेवण्यात आले मित्र कणमुसे ऊस त्या क्रशर मध्ये टाकत असताना मी सुद्धा त्याला मदत करत ऊसाचे काडके टाकून सहकार्य केले थोडासा ..तिकडे गुळ तयार झालं होत १० किलो च्या साच्या मध्ये गुळ भरले जात होते अतिशय गरम गुळ केसरी रंगाचा गुळ बघून माझ्या तोंडाला पाणीच सुटले ..माझं मनात काय चालू आहे मित्रांला कसे काय कळाले माहिती नाही ताबडतोब माझ्या समोर ताटात गुळ घेऊन मला खाण्यासाठी दिले मला इतका आंनद झाला कि त्यातील थोडासा गुळ खाऊन पाहिलं अतिशय स्वाद असलेला गरमा गरम गुळ २५ वर्षानंतर खात होतो त्या गरमा गरम गुळाचा गोडवा अजूनही माझ्या तोडातून गेला नाही मला पहिल्यांपासून ऊस ते गुळ होण्यापर्यत चा प्रक्रिया बघायचा होतो म्हणून बराच वेळ थांबलो सर्व प्रक्रिया अगदी जवळून पाहिलं अनुभवले ऊस रस काढण्या च्या मशिनवर मारुती शिंदे ,गुळ बनवणारे सांवत काका,भट्टीला आग देणारे स्वामी काका व मित्र कणमुसे याचे मोठे बंधू असे सर्वाकडून माहिती घेतली ती अशी ...

उसाचे गुऱ्हाळ करायचे म्हणजे सर्वात मेहनतीचे काम. एकदा सुरू केलेले गुऱ्हाळ सहा सहा महिने चालत होते उसाचा रस काढण्यासाठी क्रशर,उसाच्या रसाला उकळविण्यासाठी मोठी कढई, त्याखाली भट्टी, गूळ निर्मितीसाठी एक हौद अशी व्यवस्था केली जाते. शेतातून तोडून आणलेला ऊस एकाठिकाणी साठवला जातो. तो ऊस घेऊन क्रशरच्या सहाय्याने त्याचा रस काढला जातो. क्रशरचा वापर करण्यासाठी डिझेलचा वापर केला जातो काढलेला रस एका मोठ्या कढईत किंवा खास गुऱ्हाळासाठी तयार केलेल्या भांड्यात साठविला जातो. साधारणपणे एकटन उसाचा रस काढला की हा रस एका भल्यामोठ्या कढईत टाकला जातो. या कढईखाली भट्टी केलेली असते. त्यात उसाचे सालपट वाळलेल्या व भुसा टाकून रस कढईत उकळविणे सुरू होते. रस उकळताना वरच्या बाजूला मळीचा थर जमा होतो. ही मळी हटवले जाते रसातून अनावश्यक भाग विशिष्ट तापमानानंतर वर येतो. ते काढून टाकले जाते. एक कढईला १०० पेक्षाही अधिक डिग्री तापमानावर तासभर उकळविले जाते. या वेळेनंतर गूळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला चिक्की असेही संबोधण्यात येते. गूळ चिक्की धरायला लागला की कढई उचलून ती खास गूळ तयार करण्यासाठी केलेल्या पात्रात ओतली जाते. 


वाचताना हा प्रकार अतिशय सोपा वाटत असला तरी, तासभर रस उकळताना त्याकडे बारीक लक्ष द्यावे लागते. उकळी फुटल्यानंतर कढईवर मळीचा तवंग आलेला असतो. तो वेळीच काढला गेला नाही तर, गूळ काळा होण्याची शक्यता असते. अशा गुळाला मार्केटमध्ये उठाव नसतो. कढईतून गरम केलेला रस गूळ होण्याच्या प्रक्रियेत असतो. चिक्की धरलेला गूळ साच्यात टाकला जातो. १० किलोच्या गूळढेपीचे साचे होते. आता एक किलोपासून दहा किलोपर्यंत वेगवेगळ्या पात्रात ओतलेला गूळ साच्यात टाकला जातो. विशिष्ट वेळेपर्यंत साच्यात ठेवल्यानंतर गुळाची ढेप तयार होते...


हे सर्व बघत असतानाच मला गुळ तयार झाल्यावर गरम हौदात ओतले जाते तेव्हा ऊसा च्या काड्याला गुळात बुडवून खातात मी लहानपणी खूप खाल होतं तसेच ऊसा च्या काड्याला लावून स्वतः घेतले गुळ गरम व चिकट असते खाताना दातांना चिकटवून राहाते पण मजा येते असे खाण्यात आज सर्व गोष्टी अनुभवाला मिळत होते इतक्या वर्षानंतर लहानपणी च्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या वेळ झालं होत मित्रांला शेतात काम होत म्हणून तो थांबला त्याच निरोप घेऊन ऊस खात गावाकडं निघालो ..तो दिवस माझ्या आंनदायक लहानपणी च्या आठवणी घेऊन जाणार अविस्मरणीय होता..

जिवलग मित्र परमेश्वर कणमुसे यांच्या मुळे शक्य झालं त्याच धन्यवाद मानाने तेवढे कमी आहेत ..

त्याच्या सोबत सेल्फी घेतले आहेत काही फोटो काढली आहेत ..
नक्कीच आवडतील...

असे अनुभव प्रत्येकाने अनुभवाला पाहिजे ..
सहज मनतील भावना व्यक्त होत आहे ..


फोटो - शब्दांकन .....
धोंडपा नंदे वागदरी

SHARE THIS

->"२५ वर्षानंतर पुन्हा गुऱ्हाळाचा अविस्मरणीय अनुभव ! Guerilla Udyojak"

Search engine name