Cheese industry पनीर उद्योग


☼ शेतकऱ्याचा पनीर उद्योग, अर्थकारणाला गती ☼

पाणी नाही, त्यामुळं शेतीत काहीच नाही. मात्र न डगमगता किंवा निसर्गाला दोष न देता नांदेडच्या सायाळ गावातील शेतकरी माधव ढगे यांनी दुग्धव्यवसायाचा आधार घेत थेट पनीर उद्योग सुरु केला आहे.

माधव ढगे यांना रोज 40 लीटर दूध मिळतं. दोनवेळच्या दुधातून त्याचं सकाळी पनीर बनवण्याचं काम ढगे करतात.

काही वर्षापूर्वी माधव यांनी 5 म्हशी घेतल्या आणि दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. मात्र डेअरीला दूध घालणं परवडत नव्हतं. घरोघरी जाऊन दुधाची विक्री करायची म्हटली तर वाहतूक खर्चातच सगळा नफा निघून जायचा.

दूध डेअरीला दर 30 ते 32 रुपये. नांदेडला दूध घालणंही परवड नाही. मेहनत जास्त. पनीरला 50 रु. भाव आणि मेहनतही कमी, त्यामुळे पनीर बनवण्याचं त्यांनी ठरवलं.

पनीर बनविण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आणि कमी खर्चाची आहे.

मध्यम तापमानावर दूध तापवायचं. त्यात लिंबूसत्त्व किंवा व्हिनेगर मिसळून दूध फाडायचं आणि सुती कपड्यात बांधून ठेवायचं. अवघ्या 1 तासात पनीर तयार.

☼ पनीर व्यवसायाचं गणित

*माधव ढगे 40 लिटर दुधापासून पनीर तयार करतात.

*त्यांना 4 लिटर दुधापासून 1 किलो पनीर मिळतं.

*म्हणजेच 40 लिटरपासून 10 किलो पनीर.

*याची ते बाजारात 200 रुपये किलोनं विक्री करतात

*म्हणजेच 10 किलो पनीरचे 2 हजार रुपये त्यांना मिळतात.

*यातून 1 हजारांचा उत्पादन खर्च वजा जाता

*त्यांना 1 हजारांचा निव्वळ नफा होतो


माधव ढगे यांच्या पनीर व्यवसायाकडं पाहून अनेकांनी पनीर निर्मिती सुरु केली. दर तीन दिवसाला गावातून पनीर गोळा केलं जातं आणि नांदेडमध्ये त्याची विक्री होते. या पनीर व्यवसायामुळं गावच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे



SHARE THIS

->"Cheese industry पनीर उद्योग"

Search engine name