सफाई कामगार पुनर्वसन योजना

सफाई कामगार पुनर्वसन योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित


राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत रू.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे राबविली जाते.

व्यवस्थापकीय संचालक, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, 1 ला माळा, गुलमोहर क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई – 400 049.   दुरध्वनी क्रमांक  022-26202588022-26202588 , 26202586

यंत्रणेचे नाव
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
कोणासाठी
अनुसूचित जाती
किमान शैक्षणिक पात्रता
आवश्यकता नाही
वयोमर्यादा (वर्षे)
18 ते 45
लिंग
पुरूष / महिला
कार्यक्षेत्र
ग्रामीण / शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
आवश्यकता नाही
ठळक वैशिष्ठये
स्वच्छतेच्या कामाकरिता उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून रु.10.00 लाखांपर्यंत कर्ज 8% व्याजदराने दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75% रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20% रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत देण्यात येते.
कमाल कर्जमर्यादा
रू. 5.00 लाख
बँकेचा सहभाग व व्याजदर
नाही
स्वतःचा सहभाग
5%
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर
95% व व्याजदर 4% 6% प्रमाणे
अनुदान
Rs.10000/-
तारण
यंत्रणेच्या नियमानुसार
इ. एम. आय.
यंत्रणेच्या नियमानुसार
परतफेडीची सुरूवात
3 महिन्यानंतर किंवा व्यवसायानुसार
परतफेडीचा कालावधी
60 महिने
शेरा
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ च्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2% दंडव्याज आकारण्यात येते. उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत निरंक व त्यापुढे 5% असतो.

संकलन - अमरीन पठाण

SHARE THIS

1 comment:

Search engine name