कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना

दारिद्रयरेषेखालील भुमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे, या उदे्शाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबविण्यात येत आहे.  ही  योजना सन 2004 पासुन सुरु केली आहे.

या योजनेद्वारे अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीताखालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 50 टक्के अनुदान 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.


महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान ही महत्वकांक्षी योजना राज्यामध्ये सन 2004-05 पासून कार्यान्वित केली असून दारिद्रे रेषेखालील भुमीहीन शेतमजुरांना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना शासकीय अटी पूर्ण करीत असल्यास निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीता खालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.

SHARE THIS

1 comment:

  1. RRC Railway Group D Recruitment Notification 2016

    Looking forward to reading more. Great post, really looking forward to read more. Want more....

    ReplyDelete

Search engine name