मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य Financing on the purchase of fishing equipment


मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य
अ) सुत व जाळी खरेदीवर अर्थसहाय्य :-
मासेमारी साठी लागणारी जाळी व सुत मच्छिमारांना सवलतीचे दरामधे उपलबध करुन देण्यासाठी मच्छिमार सहकारी संस्थां मार्फत संस्थेच्या सभासदांना सुत व जाळी खरेदीवर अनुदान देण्यात येते.

बाब
सागरी
भूजल
अनुदान %
मर्यादा किलो
अनुदान %
मर्यादा किलो
३ टनावरील नौका
३ टनाखालिल नौका
नायलॉन सुत
१५
१००
५०
५०
मोनाफिलामेंट
१५
१००
५०
५०
शेवसूत
-
-
-
२५
तयार जाळे
१५
१००
५०
५०
ब) रांपणकारांना रापणीच्या सुतावर अर्थसहाय्य :-
बाब
अनुदान %
मर्यादा किलो
नायलॉन सुत
१५
रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो
मोनाफिलामेंट
१५
रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो
तयार जाळे
१५
रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो

क) बिगर यांत्रिक नौका बांधण्यासाठी लहान मच्छिमारांना अर्थसहाय्य :-
१ सागरी मच्छिमार :- लहान आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना १० टनापर्यंतची नौका बांधण्यास किंतीच्या ५० % किंवा रु. ६०,०००/- या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. विहित मुदतित कर्ज फेडल्यास वित्तिय संस्थेचा व्याज दर व ४ % या मधिल फरकाची रक्कम व्याज अनुदान म्हणून मिळते.
२ भूजल मच्छिमार :- आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना लहान नौका बांधण्यास किंमतीच्या ५० % किंवा रु. ३,०००/- या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.
निकष -

  • लाभार्थी दारिद्र्य रेषेखालिल किंवा अल्प उत्पन्न गटातील असावा.
  • लाभार्थी १८ ते ५० वयोगटातील क्रियाशिल मच्छिमार असावा.
  • लाभार्थी मच्छिमार सहकारी संस्थेचा सभासद असावा.
  • लाभार्थी मच्छिमार सहकारी संस्थेने पुरस्कृत केलेला असावा.
  • वित्तिय संस्थेचे अर्थसहाय्य आवश्यक.

SHARE THIS

->"मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य Financing on the purchase of fishing equipment"

Search engine name