या योजनेअंर्गत मासळी उतरविण्याच्या केंद्रावर रु. ५.०० लाखपेक्षा कमी खर्चाची
कामे हाती घेण्यात येतात. सदर कामे पत्तन विभागामार्फत करण्यात येतात. या
योजनेअंर्गत खालिल मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात.
- नौका
किना-यावर घेण्यासाठी रॅम्प.
- मासळी
सुकविण्याचे ओटे.
- उघडा
निवारा (शेड).
- जोड रस्ता.
- पिण्याच्या
पाण्याची सुविधा.
- शौचालय.
- नौका जाण्यायेण्याच्या
मार्गातील खडक फोडून अडथळा दूर करणे.
- मार्गदर्शक
दिप.
निकष -
- मच्छिमार
सहकारी संस्थेमार्फत प्रस्ताव आवश्यक.
- सदर सुविधा
निर्माण झाल्यानंतर त्याचा ताबा संस्था घेईल. संथेच्या ताब्यात सदर सुविधा
दिल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती संस्थेमार्फत करण्यात येईल असा संस्थेचा
ठराव आवश्यक आहे.
->"योजनेअंर्गत मासळी उतरविण्याच्या केंद्रावर रु. ५.०० लाखपेक्षा कमी खर्चाची कामे हाती घेण्यात येतात"