महसुली न्यायालय

महसुल मध्ये कामकाज करत असताना आपलेला अर्धन्यायिक कामकाज करावे लागते तसेच महसुली न्यायालयात अनेक केसेस चालतात. अशावेळी सुनावणी घेणे ,निकालपत्रक तयार करणे यासारखे कामकाज करावे लागते.यासर्व बाबींची माहिती आपलेला व्हावी व विविध केसेस मध्ये अधिकारी यांनी दिलेले निकाल आपलेला मार्गदर्शक म्हणून वापरता यावे यासाठी ब्लॉग वर "महसुली न्यायालय "या नावाचे पेज तयार करून त्यामध्ये विविध निकाल नमुने केवळ मार्गदर्शक म्हणून आणि माहितीसाठी संकलित केले आहेत.तसेच अनेक निकाल नमुने वेळोवेळी या पेजमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.खाली  दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण निकाल प्राप्त करू शकता. 

मंडळाधिकारी

फेरफार नोंदवही मध्ये नोंद केलेनंतर तलाठी सदर नोंदीबाबत काही आक्षेप असलेस 15 दिवसांची मुदत देऊन तलाठी कार्यालयात कळविणे बाबत हितसंबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात.उक्त 15 दिवसात एखाद्या हितसंबंधित व्यक्तीने अशा नोंदीबाबत हरकत घेतल्यास तलाठी हे सदर हरकतीची नोंद गाव नमुना- 6ब विवाद ग्रस्त प्रकरणांची नोंदवही यामध्ये नोंद करून त्या नोंदीचा सदर नोंदीबाबत प्राप्त अर्ज ,फेरफार,तक्रार अर्ज,व गाव नमुना 6ब ची नक्कल जोडून तालुक्यात पाठवतात.अशा नोंदी पुढे तक्रार केस चालवण्यासाठी मंडळ अधिकारी यांचेकडे येतात अशा वेळी वादी व प्रतिवादी यांना नोटीस बजवावी लागते व त्यांचे लेखी युक्तिवाद घ्यावे लागतात.तसेच वेगवेगळ्या फेरफार मध्ये निकाल कसे देतात व याबाबत पूर्ण कार्यवाही कशी करायची याबाबत माहिती देणारे सदर ब्लॉगवर आजपासून "मंडळाधिकारी " या नावाने चालू करत आहोत त्यामध्ये आज  वादी व प्रतिवादी यांना  बजवणेत येणारी नोटीस नमुना पाहणार आहोत.

सदर नमुना प्राप्त करणेसाठी क्लिक करा.

SHARE THIS

->"महसुली न्यायालय"

Search engine name