Businessman Marketing Plan उद्योजकाचा मार्केटिंग प्लान


मार्केटिंग म्हटले की, उत्पादन, किंमत, जाहिरात आणि जागा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.मार्केटिंग करून जर उद्योग केला तर तो उद्योग योग्य दिशेला जातो. तसेच निश्चित केलेले ध्येय साध्य करता येते. उत्पादनाची विक्री वाढवून नफा कमवणे, खर्च कमी व योग्य प्रकारे करणे अशी उद्दिष्ट्ये समोर ठेवली पाहिजेत.

योग्य मार्केटिंग हे ग्राहकांच्या हिताचे, इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यावर भर देते. मार्केटिंगमध्ये नवीन ग्राहक निर्माण करण्यावर आणि ते ग्राहक टिकवण्यावर भर दिला पाहिजे.

वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन, उच्च प्रत आणि उत्तम मार्केटिंगची डीएसके, चितळे, गाडगीळ अशी अनेक उदाहरणे आहेत.

मार्केटिंग प्लान तयार करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे : 
● उद्योगाची ध्येय आणि दूरदृष्टी.
● विशिष्ट नियोजनात्मक वेळापत्रक.
● मार्केटिंगचे उद्दिष्ट.
● स्वत:चे सामर्थ्य, उणिवा, धोका आणि संधी.
● जोखीम पत्करण्याचे धाडस.
● सुसंवाद कौशल्य.
● मार्केटिंगची अपेक्षित बाजारपेठ.
● उत्पादनातील खुबी आणि वैशिष्ट्ये.
● मार्केटींगचे घटक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
● बजेटची मार्केटिंगमधील तरतूद.
● ग्राहकाभिमुख सेवा.

मार्केटींगचा प्लान यशस्वी करण्यासाठी जिद्द, परिश्रम आणि कौशल्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. उद्योगातील तज्ञ व्यक्ती आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज आवश्यक आणि लाभदायक ठरते.
मग तयार करताय ना... मार्केटींग प्लान !  


SHARE THIS

->"Businessman Marketing Plan उद्योजकाचा मार्केटिंग प्लान "

Search engine name