BUSINESS OPPORTUNITY उद्योजक व्यवसाय संधी


 *उद्योजक* 
*जे काम तुम्ही ईतरांसाठी पगार घेऊन करता, तेच काम तुम्हाला स्वतःसाठी करा म्हटलं तर बोबडी वळते.*
प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला व्यवसायाचं ज्ञान नाहीये,

*प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात डेअरींग नाहीये.*
टाटांना, धीरुभाईंना कुणी व्यवसाय शिकवला नव्हता,
ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत.

*ऊद्योजक* काय आकाशातुन पडलेले नाहीत.
फक्त मानसिकतेचा खेळ आहे.

तुम्ही नोकरीच्या मागे पळता,
☺ *ऊद्योजक व्यवसायाच्या मागे पळतात*.

तुम्ही पगार मिळवण्याचा विचार करता,
☺ *उद्योजक पगार वाटण्याचा विचार करतात.*
 तुम्ही जगण्यासाठी धडपड करता,
 *उद्योजक जगण्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करतात.*
 तुम्ही ऊद्याच काय याचा विचार करता,
 *उद्योजक आणखी काय करायचं याचा विचार करतात*. 
 *तुमची स्वप्ने घर आणि गाडी यातच संपतात, किंवा काश्मीर टुर पर्यंत लांबतात,

*यांची स्वप्ने ईथुनच पासुन सुरु होतात*.
 तुम्ही नशीबाला दोष देतात,

*उद्योजक नशीबाचंच नशीब ऊजळवतात*. 
तुम्ही कारणे शोधतात,

*उद्योजक कारणांवर ऊत्तरे शोधतात.*
तुम्ही तोट्याचा विचार करता,

 *उद्योजक नफ्याची आकडेवारी मांडतात.*
तुम्ही डुबलो तर काय याचा विचार करता,

*उद्योजक डुबलो म्हणुन काय होईल*? 
*माझ स्कील जीवंत आहे असा विचार करतात*.

तुम्ही हरण्याचा विचार करतात,
 *उद्योजक जिंकण्याचा विचार करतात*...
व्यवसाय म्हणजे काय राॅकेट सायन्स नाही... 

*फक्त मानसिकतेचा खेळ आहे.*
व्यवसाय हे खरंच राॅकेट सायन्स नाहीये राव.
*सुरुवात करा*,
*सगळं काही आपोआप होतं*.

एक लक्षात ठेवा, व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं.
होते ती फक्त गुंतवणुक.
पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील,
पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही.
आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते.
गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते.... 

*सुरुवात करा.*
*यशस्वीच व्हाल*,
*विश्वास ठेवा*.

 *उद्योजक व्हा*...  *समृद्ध व्हा*...

SHARE THIS

->"BUSINESS OPPORTUNITY उद्योजक व्यवसाय संधी"

Search engine name