Digita locker लायसन्स घरी विसरलात तर





घरातून निघतांना तुम्ही ड्रायविंग लायसन्स घरी विसरता किंवा आरसी बूक देखील घरीच विसरुन जाता तेव्हा ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करतात. पण आता तुम्हाला घाबरण्ाची गरज नाही.

लायसन्स घरी विसरलात तर
काही दिवसांपूर्वी सरकारने ड्रायविंग लायसेन्सची हार्ड कॉपी ठेवण्याची सक्ती शिथील केली आहे. पण जर तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल तर काय अनिवार्य आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



आता दंड नाही
ड्रायविंग करतांना जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसेन्सची हार्ड कॉपी नसेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपी दाखवून देखील दंड टाळू शकता. पण यासाठी अट अशी आहे की, त्यासाठी तुमच्याकडे लायसन्सची सॉफ्ट कॉपी तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये असली पाहिजे. येथून ट्रॅफिक पोलीस तुमचं ड्रायविंग लायसेंस वेरिफाय करेल. डिजिटल लॉकर हा पीएम यांच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा भाग आहे.
 

काय आहे डिजिटल लॉकर
सरकारने डिजिटल लॉकरला एका खास उद्देशाने लॉन्च केलं आहे. याचा उद्देश भौतिक कागदपत्रांचा वापर कमी करण्यासाठी आहे. ई-कागदपत्रांचा वापर वाढवण्यासाठी भर देण्यात येणार आहे. डिजिटल लॉकरमध्ये अकाउंट बनवून त्यामध्ये तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत यासारखे महत्त्वाचे कागदपत्र ठेवू शकता. डिजिटल लॉकरमध्ये ई-साइनची सुविधा देखील आहे. ज्याचा उपयोग डिजिटल रूपात हस्ताक्षर करण्यासाठी देखील होऊ शकतो.
असं बनवा डिजिटल लॉकर
डिजिटल लॉकरसाठी तुम्हाला https://digitallocker.gov.in वर तुमचं अकाउंट बनवावं लागेल. यासाठी तुम्हाला आधार नंबरची आवश्यकता आहे. साईटवर साईनअप केल्यानंतर तुमचा आधारकार्ड नंबर द्यावा लागेल. दोन ऑप्शन यासाठी यूजरच्या वेरिफिकेशनसाठी असतील. पहिला ऑप्शन म्हणजे ओटीपी, वन टाइम पासवर्ड ज्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पासवर्ड येईल. जर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडता म्हणजे अंगठ्याची खून निवडता तर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागेल. वेरिफाय झाल्यानंतर तुम्ही तुमचं युजरनेम आणि पासवर्ड ठेवू शकता.

सरकारी विभागांसोबत शेअर करा
तुम्ही डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याच्या समोर शेअर असा विकल्प असतो. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही ज्या व्यक्ती किंवा संस्थेसोबत ते कागदपत्र शेअर करु इच्छिता. त्यांचा ईमेल आयडी टाकून शेअर करु शकतो.



SHARE THIS

->"Digita locker लायसन्स घरी विसरलात तर"

Search engine name