पुनर्विकसन इमारतींचे मुल्यांकन:


जुन्या इमारती पाडुन नविन इमारती बांधण्याचं सध्या फॅड आलय. पुण्या मुंबईत तर बिल्डराना सर्रास जुन्या इमारती दिल्या जात आहेत. जुन्या पाडल्याअ जाणा-या इमारतीचे विकसन मुल्यांकन पकडले जात होते. मात्र नवीन आदेशानुसार क. ३१ खाली अभिनिर्णय करुन घेतल्यास असे मुद्रांक आता भरण्याची गरज नाही. पुढील वर्षी मात्र हि तरतुद रेडी रेकनरमधे येणार आहे.

नोंदणी: नोंदणीसाठी पुर्वमुद्रांकित केलेला व सह्या झालेला दस्त (दोन साक्षीदारांचे) सह्यांसहित निष्पादित केलेला मुळ दस्त सदर दस्ताच्या तारखेपासुन चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी हजर करावा लागतो. पुणे शहरात एकुण २० नोंदणीची कार्यालये असुन, कोणत्याही कार्यालयातुन दस्त नोंदविता येतो. मात्र इतर क्षेत्रांत त्याच कार्यक्षेत्रातील नोंदणी कार्यालयात दस्त नोंदवावा लागतो. चार महिन्यांत दस्त न नोम्दविल्यास पुढील चार महिन्यात दंड भरुन दस्त नोंदविता येतो. दस्त निबंधकांना समजेल अशा कोणत्याअही भाषेत असु शकतो. दस्ताची नोंदणी करण्यापुर्वी संपुर्ण दस्तांची सर्व जोडलेल्या कागदपत्रांसहित ९० जीएसएम कागदावर बटरपेपर सहित फोटोप्रत काढणे आवश्यक असते. याशिवाय सर्व वर्णनाचा एक इनपुट फॉर्म लिहून देणार/घेणार यांची सही असलेला सादर करावा लागतो. पुण्यासारख्या शहरात दस्त नोंदणीसाठी खुपच गर्दी असल्याने आदल्या दिवशी सकाळी जाऊन दुस-या दिवसाचे नंबरचे टोकन घ्यावे लागते. त्यामुळे ९० जीएसएम फोटोप्रत व इनपुट फॉर्म अगोदर जमा करावा लागतो.

मात्र नुकत्याचे झालेल्या सुधारणांनुसार igr.maharashtra.gov.in या संकेत स्थलावर जाऊन सकाळी १० ते १ च्या दरम्यानच्या पहिल्या २० दस्तांसाठी योग्य त्या नोंदणी कार्यालयात ३० दिवस अगोदरपर्य्त नोंदणीसाठी आरक्षण करण्याची सोय आहे. ठरलेल्या वेळेच्या १० मिनिटे अगोदर नोंदणीसाठी सर्व पक्षकारांनी त्यांच्या वकिलासह हजर राहणे आवश्यक ठरते. वकिलाए बार कौन्सिल ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. 

सर्व पक्षकार ह्जर नसल्यास उपस्थीत पक्षकारांकडुन दस्ताची ADM प्रलंबित नोंदनी होऊ शकते. उरलेल्या पक्षकारांनी नोंदणीच्या दोन महिन्यांच्या आत सदर कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी दस्तातील आवश्यक सर्व तपशिलाचे Computer Feeding झाल्यानंतर नोंदणीपुर्व दस्त गोषवारा प्रिंट अपलब्ध होते. ती अतिशय काळजीपुर्वक वाचावी व दस्ताशी मिळवुन पहावी. दस्त सादर करणा-याची सही झाल्यानंतर सर्व पक्षकाराचे संगणकावर फोटो काढले जातात व सदर प्रतीवर पक्षकारांच्या दोन प्रतींत सह्या घेतल्या जातात. याशिवाय वकिलांची ओळख म्हणुन सही घेतली जाते. 

दस्त साक्षिदारास नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नसते. सर्व सह्या झालेला दस्त गोषवारा भाग-१ व भाग-२ हे मुळ दस्त सादर करणा-यांची मुळ रजिस्टरवर सही झाल्यानंतर लगेचच परत मिळतो. त्यापुर्वी मुळ सदर दस्तांचे प्रत्येक पानावर निबंधकाचा शिक्का पेज नंबर येथे आवश्यक असते ते त्याच वेळी तपासावे. याशिवाय मुळ नोंदणीची पावती व सुची क्र. २ ची मुळ प्रत निबंधकाच्या सही शिक्क्यंसहित लगेच ताब्यात मिळते. सुची क्रं. २ साठी रु. २०/- चे कोर्ट स्टॅम्प तिकीट चिटकवावे लागते. तेही तयार ठेवावे.

SHARE THIS

->"पुनर्विकसन इमारतींचे मुल्यांकन:"

Search engine name