*पैशाच्या खाजगी देवघेवीचे व्यवहारशास्त्र*
आज बँका, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, बिझनेस लोन असे आर्थिक व्यवहारांचे अनेक मार्ग आहेत, त्याद्वारे आपण गरजेच्या वेळी पैसा उभा करू शकतो; पण ज्यावेळी एखाद्याला खाजगीत कुणाकडे पैसे मागावे लागतात, याचाच अर्थ त्याची बाजारातील पत संपली आहे असे समजावे. तरीपण माणुसकी म्हणून आपण मित्र, नातेवाईक, कर्मचारी, सहकारी यांना खाजगीत उसने पैसे देतो व घेतो, पण यासाठीही एक व्यवहार- शास्त्र जपावे. पैशाने माणसे जोडली तसेच तोडलीही जातात, तेव्हा असे व्यवहार जपून करावेत.
त्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे
१) पैसे देताना ज्याला देतो, त्याचा स्वभाव, वर्तन योग्य असावे. टारगट, गुंड, भांडखोरांशी व्यवहार करणे टाळा.
२) आपली परतफेडीची ऐपत तपासून तेवढेच पैसे उसने घ्या.
३) उसने पैसे देताना तुमच्या वार्षिक बचतीच्या ५०% हून अधिक उसने देऊ नका.
४) तुमच्या ५ महिन्याच्या कमाईहून अधिक उसने पैसे घेऊ नका.
५) ज्यांच्याशी तुमचा नियमित संबंध व संपर्क आहे, अशांनाच पैसे उसने द्या.
६) त्यांचे मित्र, नातेसंबंध, साधनसंपत्ती इत्यादीचा अंदाज घ्या.
७) प्रामाणिक, चांगल्या माणसाला जरूर मदत करा.
८) ज्याचे पैसे उधार घेतले ते वेळेत फेडा, पण तिसऱ्याचे घेऊन पहिल्याचे फेडण्याची साखळी बनवू नका.
९) न मागता योग्य वेळेत पैसे परत करा व आपली पत वाढवा.
१०) काही दुसऱ्या मार्गाने त्यांची मदत करून त्याच्या उपकाराची परतफेड करा.
११) घेतलेले पैसे तंतोतंत व केवळ मुख्य गरजेपोटीच वापरा.
१२) सावकारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पैसे घेऊ नका.
१३) उसने पैसे देऊन तुम्हीच अडचणीत येणार असाल व पैसे बुडले तर तुम्हाला सोसणार नसेल, तर उधारी देऊ नका.
१४) आपल्यापेक्षा जास्त ताकदवान माणसाला उसने पैसे देणे टाळा, नाहीतर तुम्हाला वसूल करता येणार नाहीत.
१५) एकाचे पैसे घेऊन दुसऱ्याला उधार देऊ नका. नसती एजंटगिरी करू नका.
१६) गरजेच्या वेळी आपल्या माणसाच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्य आहे, पण त्यामुळे तुम्हीच गोत्यात तर येणार नाही ना, याची काळजी घ्या, नाहीतर समाजसेवा तुमच्या अंगलट येईल.
१७) खाजगी, तोंडी आर्थिक व्यवहार खूप वाईट, यामुळे अनेकजण जीवाला मुकलेत.
१८) पैसे देताना दोनच नियम लावा :
• तुमची खरंच त्याच्यावर प्रेमभावना आहे.
• मनगटात वसुलीची ताकद आहे, अशावेळीच उसने पैसे देऊन मदत करा.
१९) फक्त उसने पैसे मागण्यासाठी संपर्क साधणाऱ्याला १ रुपयासुध्दा देऊ नका.
- प्रा. प्रकाश भोसले

0D492CDDC3
ReplyDeletekiralık hacker
hacker arıyorum
kiralık hacker
hacker arıyorum
belek