भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणे Akrisik Bhukhandachiभोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करण्याच्या प्रक्रियेचे स्वरूप :-


१. अर्जदाराचा अर्ज

२. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचा अहवाल.

३. सदर प्रस्तावाची छानणी अंती खालील बाबींची खात्री करणे आवश्यक असते.

१. अर्जदार यांचे मालमत्ता पत्रक

२. मंडळ अधिकारी यांचा स्थळनिरीक्षण पंचनामा, तपासणीसुचीनुसार जबाब, जमीन घेणार व देणार यांचे जातीचे दाखले / शाळेचे दाखले.

३. उपवनसंरक्षक यांचा वन जमीन नसले बाबतीत अभिप्राय.

४. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम यांचे चालू बाजार भावानुसार  मूल्यांकन.

५. भूसंपादन शाखेचा भसंपादन बाबत अभिप्राय

६. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील बांधकामाचे मूल्यांकन

४. वरील बाबींची पूर्तता झाल्याची खात्री करून अर्जदार यांचे अर्जाचे अनुशंगाने जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांचेकडेस टिपणी सादर करणे. टिपणी मंजूर झालेनंतर अर्जदार यांस अनर्जित उत्पन्नाची रक्कम चलनाने सरकार जमा करणे बाबत कळविणे.

५. अर्जदार यांना अनार्जित उत्पन्नाची रक्कम चलनाने सरकार जमा केलेनंतर भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत जमीन विक्री नियामाधीन करणे बाबत अंतिम आदेश पारित करणे.


आवश्यक कागदपत्रे :-

१. अर्जदार यांचा अर्ज 

२. अर्जदार यांचे मालमत्ता पत्रक

३. मंडळ अधिकारी यांचा स्थलनिरीक्षण पंचनामा देणार घेणार यांचे तपासणी सूचीनुसार जबाब इ.

४. उपवनसंरक्षक, भूसंपादन पुर्नवसन यांचे अभिप्राय

५. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांचे चालू बाजार टक्यानुसार मूल्यांकन

६. अनार्जित रक्कम भरणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र .

निर्णय घेणारे अधिकारी :-
भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणे प्रकरणी जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी हे अंतिम अधिकारी आहेत.
शासन निर्णय :

१. महाराष्ट्र जमीन महसूल पुस्तिका खंड २ परिच्छेद ८६

२. शासन परिपत्रक महसूल व वनविभाग क्र. जमीन १०/२००२/प्र. क्र. २०७ /ज -१ दि. २९ मे २००६.

३. शासन परिपत्रक महसूल व वनविभाग क्र. जमीन ११/२००७/प्र. क्र. ९८ /ज -१ दि. ३१/१२/२००७.


SHARE THIS

->"भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणे Akrisik Bhukhandachi"

Search engine name