NPS- नवीन पेन्शन योजना


व्हीएलई
आज आपणास सीएससीच्या अशा माहिती देणार आहोत ज्या सर्विसमुळे आपण थोड्याच दिवसात चांगले उत्पन्न करू शकतात या सर्व्हिसचे नाव आहे 

नवीन पेन्शन योजना ( NPS- New Pension System ) योजना :-
भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे.

योजना अशी काम करेल.
१. PFRDA संस्था बँकांना / सीएससी केंद्र व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन.
२. बँकेत / सीएससी केंद्र किवा पोस्ट ऑफिस जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २)
३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली / सोडली तरी हा नंबर कायम राहील.
४. अकाउंट उघडल्यावर दरमहा धारक पैसे जमा करेल. ( दरमहा कमीत कमी ५०० रू टियर १ मध्ये तर १००० रू टियर २ रु ते कितीही).
५. धारकाला अकाउंट उघडतानाच फंड मॅनेजर निवडावा लागेल. उदा आयसिआयसिआय, रिलायन्स, आयडिएफसी, स्टेट बॅन्क इत्यादी )
६. धारकाचे पैसे वरील फंड शेअर बाजारात गुंतवतात.
७. टियर १ ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.
८ टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.
९ आपली रक्कम दुसर्‍या फंड मॅनेजरकडे वळवता येते.
१० साधी आणि सोपी योजना. म्युचवल फंडाचे फायचे पण फंड निवडायची कटकट नाही.
११. टियर १ मध्ये ६० वर्षानंतर ४० टक्के रक्कम ही विमा कंपनीत परत गुंतवावी लागते व उरलेली रक्कम एकरकमी उचलता येते.
१२. गुंतवणूक करण्यासाठी अ‍ॅटो (म्हणजे लाईफसायकल फंड) व अ‍ॅक्टीव चॉईस ( म्हणजे इक्वीटी, बॉन्ड इ. इ) फंड उपलब्ध आहेत.
थोडक्यात ही योजना अमेरिकेच्या ४०१k सारखी आहे, पण ४०१k मध्ये आपली कंपनी पण रक्कम गुंतवते, इथे मात्र तसे नाही.

उदाहरणासाठी तुम्ही जर ५००० रु प्रतिमहिना असे २० वर्षे ह्या योजनेत दिले आणि किमान साधारण फक्त ६ टक्के (आज घडीस १० टक्के मिळत आहे) परतावा घेतला तर तुमच्याकडे २० वर्षानंतर ३५ लाख रू जमा असतील!
आणखी एक उदहारणद्वारे समजुन घेऊ जर तुम्ही २५ वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर ६० वर्षापर्यंत दर महिन्याला १००० हजार रुपये या योजनेत गुंतवायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक ४ लाख २०,००० रुपये असेल. NPS मध्ये गुंतवणुकीवरचे रिटर्न कमित कमी ८ टक्के ( सध्या १०% च्या वर आहे) धरले तर एकूण पैसे ३८.२८ लाख रुपये होतील. यातल्या ६० टक्के रकमेतून एन्युटी खरेदी केली, तर व्हॅल्यू जवळजवळ २३ लाख रुपये होईल. एन्युटी रेट ८ टक्के असेल तर ६० व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला १०००० हजार रुपये पेन्शन मिळेल. सोबत २३ लाख रुपये फंडही.
आयडीएकसीच्या E योजनेने आत्तापर्यंत स्थापने पासून ४१% परतावा दिला आहे तर त्याच कालावधीत निफ्टीने ३६%. अर्थात हा दिर्घ कालावधी असल्यामुळे मधील उच्चांकाच्या वेळी निफ्टीचा परतावा जास्त असेल पण पेन्शन फंड असल्यामुळे पैसे काढता आले नसतेच.

गरज पडल्यास पैसे काढता येतील का ?
हो, जर त्या व्यक्तीस मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा काही आजारपणासाठी गरज पडल्यास स्कीम सुरू केल्यापासून ३ वर्ष पूर्ण झाले असल्यास २५ % रक्कम काढता येते असे आयुष्यात ३ वेळा पैसे काढता येतात.

व्हीएलई यांचे नोंदणीद्वारे उत्पन्न कसे वाढणार आहे हे पाहू.
आता आपण पाहू व्हीएलई यांना कसा फायदा आहे. या सर्व्हिस मध्ये  एक NPS खाते उघडण्यासाठी व्हीएलई कमिशन १६० रुपये आहे जर आपण रोज काही लोकांना ही योजना समजावून सांगितली आणि ५०० रुपयांपासून स्कीम सुरू करण्यास सांगितले तर ग्राहकास ५०० रुपये फार वाटत नाहीत म्हणून सहजपणे १० ग्राहक तयार करता येतात म्हणजे दिवसभरात १० ग्राहक × १६० रुपये = १,६०० रुपये दिवसभरात कमावता येतात याचप्रकारे जर कॅम्प मध्ये काम केले तर अधिक जास्त अकाउंट ओपन होऊ शकतात पण आपण गृहीत धरू रोज १० अकाऊंट काढले आणि महिन्यातून २० दिवस काम केले तर १६०० × २० = ३२,००० याप्रमाणे कमाई करता येते याचप्रमाणे ३२,००० × १२ महिने = ३,८४,००० इतकी वार्षिक कमाई होऊ शकते

व्हीएलई करिता मासिक उत्पन्न :- 
जर या सर्व ग्राहकांनी वर्षभरात एकूण दररोज १० × २० दिवस = २०० × १२ महिने = २४०० ग्राहक होतात हे वर्षभरात दुसरा व्यवहार पूर्ण करण्यासाठी कमीत कमी एक व्यवहार करण्यासाठी त्याच व्हीएलई कडे येतील त्यामुळे हफ्ता भरण्याचे व्हीएलई कमिशन १६ रुपये प्रति हफ्ता प्रमाणे १६ × २४०० ग्राहक = ३८,४०० याचप्रमाणे हा आकडा दरवर्षी वाढणारच आहे. म्हणजे जसे तुमचे ग्राहक वाढतील तसे तुमचे उत्त्पन्न वाढत जाणार आहे.

ग्राहक फायदा:-

व्हीएलई बंधूनो विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्वी फक्त सरकारी नोकरांना दिला जात असे परंतु तो आता सर्व ग्राहकांसाठी खुला केला गेला आहे आपण पाहतच आहोत सध्या रिटायर्ड लोकांना किती पेंशन मिळते आहे त्यांच्या पेन्शनवर पूर्ण कुटुंब सुखी आहे. यावरूनच या प्लॅन मध्ये ग्राहकांचा किती फायदा आहे हे आपल्या लक्षात येईल.

कोण घेतं ही गुंतवणुकीची जबाबदारी?
नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS)मध्ये जमा केलेल्या पैशाची गुंतवणूक करण्याची जबाबदारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ( PFRDA ) द्वारा रजिस्टर्ड पेन्शन मॅनेजर्सना दिली जाके. हा फंड मॅनेजर तुम्हाला इक्विटी, सरकारी सुरक्षा आणि गैर सरकारी सुरक्षा याव्यतिरिक्त फिक्स उत्पन्न होईल अशी गुंतवणूक करतो. तुम्ही त्यापैकी निवड करू शकता.

कोण घेऊ शकतो NPS चा फायदा?
नॅशनल पेन्शन सिस्टम ( NPS ) मध्ये १८ ते ६० वर्षाच्या वयोगटातला पगारदार येऊ शकतो. अगोदर ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. आता २००९ पासून खासगी नोकरी करणारेही ही योजना घेऊ शकतात.

सीएससी मधून सध्या या योजनेशी निगडित स्कीम चालू आहे. ज्याद्वारे व्हीएलइ यांना प्रोत्साहनपर आकर्षक फायदाही  मिळणार आहे.  तरी आजच आपण या योजनेत सर्व अशासकीय नागरिक / व्यावसायिक यांना सहभागी करावे.



SHARE THIS

->"NPS- नवीन पेन्शन योजना"

Search engine name