मुल्यांकननोंदणी व मुद्रांक विभाग दर वर्षी जानेवारिपासुन नविन मुल्यांकन रेडी रेकनर उपलब्ध करुन देतात. त्या प्रमाणेच मुद्रांक शुल्क खरेदी करणे आवश्यक असते. या मुल्यांकनापेक्षा मोबदला रक्क्म जास्त असल्यास त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. मात्र कमी असल्यास रेडि रेकनरप्रामाणे आकारले जाते. मात्र मोबदल कमी असल्यास नवीन प्राप्तीकर कायदयातील बदलानुसार या फरकावरील रकमेवरसुद्धा प्राप्तिकर देय आहे. त्यामुळे मोबदला कमी दाखविण्यात यापुढे अर्थ नाही.

घसारा: (Depreciation)
जुन्या गाळ्यावर जर दोन वर्षापुर्विचे महापालिका भोगवटा प्रमाणपत्र कर दाखला किंवा लॅंडलाइन दुरध्वनी/विद्युत विलांवरुनही घसारा रक्कम ५% किंवा पुर्वायुष्यावर ७०% पर्यंत मुल्यांकनावर घसारा मिळतो.

दुकान गाळ्यांचे मुल्यांकन
 अ) रस्ता सन्मुख नसलेल्या दुकानांचे मुल्यांकन दराचे ८०% पकडले जाते.
आ) खालील तळमजल्यावरील दुकानांचे मुल्यांकन दराचे ८०% पकडले जाते.

गाळ्याच्या भोवतीची मोकळी जागा :
गाळ्याबरोबर भोवतीची मोकळि जागा विकली असल्यास जमीनदराच्या ४०% पकडले मुल्यांकन जाते.

गच्ची टेरेस:गाळ्याच्या लगतचे टेरेसचे मुल्यांकन दराच्या ४०% पकडले जाते. वरिल मजल्यावरील टेरेसचे मुल्यांकन दराचे २५% पकडले जाते.

पार्किंग:बांधीव छताच्या पार्किंगसाठी महापालिका क्षेत्रात दराच्या २५% मुल्यांकन होते. खुले पार्किंग सदर जमिनीच्या दराच्या २५% मुल्यांकनाने होते.

लिफ्ट: लिफ्ट नसल्यास तिस-या मजल्यासाठी दराच्य ९०% मुल्यांकन होते आणि चौथ्या मजल्यासाठी दराच्य ८०% मुल्यांकन होते. लिफ्ट असल्यास ५ ते १० व्या मजल्यासाठी दराच्य १०५% मुल्यांकन होते. ११ ते २० वा मजल्यासाठी दराच्या ११०% मुल्यांकन होते. २१ मजल्याच्या पुढे दराच्या ११५% मुल्यांकन होते.
SHARE THIS

->"मुल्यांकन"

Search engine name