Business model selling vegetables and fruits online ऑनलाईन भाजीपाला आणि फळे विक्री बिझनेस मॉडेल



*ऑनलाईन भाजीपाला आणि फळे विक्री बिझनेस मॉडेल*


आज स्वतःचा व्यवसाय सुरु करणे ही काळाची गरज बनली आहे. परंतु प्रत्येकाजवळ मोठे भांडवल आणि व्यवसायाचे योग्य ज्ञान असतेच असे नाही. आपण शेतकरी असाल आणि आपणही शेतीपूरक व्यवसाय करण्यास इच्छुक असाल परंतु आपल्याजवळ मोठे भांडवल आणि व्यवसायाचे पुरेसे ज्ञान नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. या लेखामध्ये आज तुम्हाला वर्षभर खात्रीशीर उत्पन्न मिळवून देऊ शकणारी एक उत्तम व्यवसाय संकल्पना कळणार आहे. या व्यवसायासाठी उच्छ शिक्षण आणि मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही. हा व्यवसाय आहे ऑनलाईन भाजीपाला आणि फळे विक्री आणि वितरण सेवा. आपण आपल्या शेतातील भाजीपाला आणि फळे ऑनलाईन पद्धतीने थेट ग्राहकांना विकू शकता. 

१) मुंबई मार्केट साईझ: मुंबई व आजूबाजूच्या शहरांना भाजीपाला आणि फळे पुरवठा करणारी एपीएमसी मार्केट, वाशी हे सर्वांत मोठी मंडई आहे. या मंडई मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून रोज सुमारे ८०० होऊन अधिक ट्रक भरून भाजीपाला आणि फळे येत असतात. सन २०१८/१९ या आर्थिक वर्षात  या मंडईमध्ये तब्बल १०० कोटींहून अधिक होलसेल शेतमालाची उलाढाल झाल्याचा अहवाल आहे.

२) शेतकऱ्यांना फायदा :  एका सर्व्हे मध्ये असे आढळले की नाशिक मधील १२०० शेतकऱ्यांनी मिळून एक गट बनवून लॉक डाउन कालावधीमध्ये मुंबई, नाशिक आणि पुण्यातील ५७००० ग्राहकांना फळे आणि भाजीपाला वितरित केला. यातून त्यांची दरमहा ४ कोटींच्या आसपास कमाई झाली.  
मीरा भाईंदर शहाराची लोकसंख्या जवळपास १९ लाख  इतकी आहे. या शहरात लहान-मोठे मिळून ८००-९०० भाजीपाला आणि फळविक्रेते आहेत मुंबई आणि नजीकच्या MMRDA क्षेत्राचा विचार केल्यास येथे  जवळजवळ अडीच कोटी लोकसंख्या आहे. या क्षेत्रात अंदाजे २० हजार भाजीपाला आणि फळ विक्रेते आहेत. एका विक्रेत्याचा रोज सरासरी ४००० ते ५००० रुपयांचा व्यवसाय होतो व रोज निव्वळ नफा रु. ८०० ते १००० होतो. म्हणजे येथे दरमहा भाजीपाला आणि फळ बाजारात ३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. 

३)  वेब मॉडेल : वरील आकडे हे आश्चर्यकारक असले तरी मुंबईसारख्या मोठ्या शहरात हे मार्केट अद्याप असंघटित म्हणजेच Unorganised आहे. या मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांमधील भाजीपाला आणि फळे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठी संधी आहे. ते ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपल्या शेतातील फळे आणि भाजीपाला यांची बास्केट तयार करून ती थेट आपल्या ग्राहकांपर्यंत वितरित करू शकतात. हे बिझनेस मॉडेल आपल्या शेतातील फळे आणि भाजीपाला शहरातील आपल्या ग्राहकांना थेट घरपोच वितरित करण्यात सुलभता प्रदान करते. 
 
४) डिस्ट्रिब्युटर रिटेल नेटवर्क : एखाद्या शहरात किंवा त्या शहरातील कोणत्याही भागात भाजीपाला आणि फळे वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी किमान एक तरी वितरक (Distributor) नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याचे १०X१० चे दुकान असले पाहिजे. तो रोज भाजीपाला आणि फळांची बास्केट  आपल्या दुकानात स्टोअर करून बुकिंग ऑर्डरप्रमाणे ती ग्राहकांपर्यंत घरपोच वितरित करेल. त्याला योग्य मार्जिन द्यावे.


५) या व्यवसायाचे फायदे : 


• Cost Effective Business Model : या व्यवसायात शेतकरी आणि ग्राहकांचे बरेच पैसे वाचतात. नियमित सप्लायचैन मध्ये असलेल्या एजंट्स आणि दलाल यांना मिळणार हिस्सा थेट शेतकऱ्यांना मिळतो. तसेच ग्राहकांना मंडईपेक्षा किंमतीपेक्षा स्वस्त दारात  भाजीपाला आणि फळे मिळतात. उदा. शेतकऱ्याच्या शेतातून बाहेर निघणाऱ्या टोमॅटोला समजा १० रु किलो हा भाव मिळत असेल तर तोच टोमॅटो मुंबईसारख्या शहरात ४० रुपये किलों या दराने विकला जातो. म्हणजे दारात ३० रुपयांचा फरक आहे. ऑनलाईन विक्री करताना शेतकरी टोमॅटो ३० रु. किलो दराने विकू शकतात यामुळे ग्राहकांना १०  रुपयांची सूट मिळते आणि शेतकऱ्यांचाही प्रति किलो १० रुपये फायदा होतो. 

• ताजी, स्वादिष्ट फळे- भाजीपाला : या बिझनेस मॉडेलमधून ग्राहकांना ताजी व  स्वादिष्ट फळे आणि भाजीपाला वितरित करता येतो. ऑर्डर बुकिंग झाल्यावर लगेच बास्केट तयार करून दुसऱ्या दिवशी ती ग्राहकांपर्यंत पोच करता येतील. 

• ऑनलाईन, तयार ग्राहक : या बिझनेस मॉडेल मध्ये भाजी पाला आणि फळांचा खप होण्यासाठी ग्राहक शोधण्यास अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. विशेषतः वितरकांचे कष्ट वाचतात कारण ऑनलाईन बुकिंग मुळे त्यांनाच आयते ग्राहक मिळतात. त्यांना फक्त ऑर्डर पोच करण्याचे काम असते. 

• सुलभ पेमेंट सुविधा : बुकिंग प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन सल्याने पेमेंटही ऑनलाईन करता येते. हा एक सुरक्षित आणि सुलभ मार्ग आहे.  

६) हा व्यवसाय सुरु करण्याच्या पायऱ्या : 


• ऑनलाईन भाजीपाला आणि फळे विक्री व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वप्रथम एक डीटेल्ड फिजिबिलिटी रिपोर्ट / बिझनेस प्लॅन तयार करावा, त्यानुसार तुम्हाला हा व्यवसाय चालवणे सुलभ होईल. 

• तदनंतर या व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करा . शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि फळे घेऊन त्यांचे संकलन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एक कलेक्शन सेंटर सुरु करावे, जेथे सर्व शेतकरी व त्यांची उत्पादने यांची माहिती असेल. 

• बुकिंग झाल्यानंतर फळे व भाजीपाला ग्राहकांपर्यंत वितरित करण्यासाठी मालवाहतूक (Transportation) आणि वितरण (Distrubution) मॉडेल तयार करावे. 

• ग्राहकांकडून बुकिंग ऑर्डर्स मिळवण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स किंवा अँप विकसित करावे

• या व्यवसायातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करून तिची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी. 

• व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी एक सक्षम मॅनेजमेंट टीम तयार करावी. 

🎯 व्यवसाय साक्षर व्हा.......

🎯 उद्योजक बना......

SHARE THIS

->"Business model selling vegetables and fruits online ऑनलाईन भाजीपाला आणि फळे विक्री बिझनेस मॉडेल"

Search engine name