महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजना

1.      महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना
2.      प्रशिक्षण योजना
3.      प्रशिक्षणार्थींना खालीलप्रमाणे विद्यावेतन देण्यात येते
4.      बीज भांडवल योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 1978 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 500 कोटी रुपयांचे असून 51 टक्के भांडवल राज्य शासन व 49 टक्के भागभांडवल केंद्र शासनाचे आहे. महामंडळ केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवित असून महामंडळाला निधी राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होतो. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालये व विभागीय स्तरावर प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत.


महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

50 टक्के अनुदान योजना
1.
प्रकल्प मर्यादा 50 हजार रूपयांपर्यंत.
2.
प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षांत करावयाची आहे.

प्रशिक्षण योजना

अनुसूचित जातीच्या लाभधारकास व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरू करण्याकरिता विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत (3महिने ते 6 महिन्यापर्यंत) मोफत प्रशिक्षण देण्यात येते. उदा. शिवणकला, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीक वायरमन, टर्नर, फिटर, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग, मशिनवर स्वेटर विणणे, खेळणी बनविणे, नळ जोडणी, टी.व्ही. व रेडिओ/टेपरेकॉर्डर, मेकॅनिक, संगणक प्रशिक्षण, मोटर वाईडिंग, फॅब्रिकेटर/वेल्डिंग, ॲटोमोबाईल रिपेरिंग (टू, थ्री, फोर व्हीलर) पेंटिंग (ऑटोमोबाईल्स), मशरुम, वाहनचालक, चर्मोद्योग, घड्याळ दुरुस्ती, फोटोग्राफी, कंपोझींग, बुक बायडिंग, सुतारकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी.

प्रशिक्षणार्थींना खालीलप्रमाणे विद्यावेतन देण्यात येते

1. स्थानिक प्रशिक्षणार्थ्याला 300 रूपये- प्रति महिना
2.
महानगरपालिका क्षेत्रात 500 रूपये- प्रति महिना
3.
प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींच्या जिल्ह्याबाहेर असल्यास 600 रूपये- प्रति महिना प्रशिक्षणार्थींस विद्यावेतन देण्यात येते.
4.
प्रशिक्षण फी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना महामंडळामार्फत देण्यात येते.

बीज भांडवल योजना

महात्मा फुले विकास महामंडळाला प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते.
योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे
1.
प्रकल्प मर्यादा 50,000 रूपये ते5 लाख रूपयांपर्यंत
2.
प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा 10,000 रूपयांचा समावेश आहे.
3.
बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो.
4.
महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षांच्या आत करावी लागते.
5.
अर्जदारास 5टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.
तरी इच्छुक उमेदवारांना संपर्क साधण्यासाठी पत्ता किंवा अधिक माहितीसाठी बरॅक नं. 18 सचिवालय जिमखान्यामागे, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई 400021, दूरध्वनी क्र. 022-22023791, फॅक्स -22023791 येथे संपर्क करावा.
मुख्य कार्यालयाचा पत्ता- एन-1, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र.9, जे.व्ही.पी.डी. स्कीम जुहू, मुंबई-400 049, दूरध्वनी क्र. 26202852/ 26200351, फॅक्स-022-26705173 असा आहे.

-
मनीषा पिंगळे,
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

SHARE THIS

->"महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजना"

Search engine name