Art For Sale विक्रीची कला


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो. त्याला ‘विक्रीची कला’ म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात. विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात
                                      
विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते. उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके-अंक, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे जाहिरात केली जाते. जाहिरातीने विक्रेते आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो.

विक्रीची कला यामध्ये वस्तूची जाहिरात महत्त्वाची  मानली जाते. ग्राहकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न विक्रेता करतो. ग्राहक उत्पादनाशी जोडला तर तो ग्राहक टिकवून विक्रेता दुसरे ग्राहक शोधात असतो. ग्राहकाचे वस्तूशी समाधान झाले की तो ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येईल याची विक्रेता काळजी घेतो.

• विक्री कलेतील वैशिष्ट्यपूर्ण घटक :
• विक्रीचा प्रामाणिक प्रयत्न करणे.
• ग्राहकांचे मत जाणून त्यांना खरेदीकडे वळवणे. 
• ग्राहकांचा विश्वास साधणे.
• ग्राहक आणि विक्रेत्याचा फायदा हा चांगली सेवा देऊन करणे.
• वस्तूंची संपूर्ण माहिती देऊन निर्यात करणे.

• विक्री कलेची तंत्रे : 
• मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.
• ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे.
• रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे.
• गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे.
• फ्री सॅम्पल सारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे.
• ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.
अशा प्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत झाली पाहिजे.


SHARE THIS

->"Art For Sale विक्रीची कला "

Search engine name