आले (आद्रक) लागवड प्रचलित अशा प्रमुख जाती


जाती : आले हे जमिनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते.

सुंठनिर्मितीसाठी : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाडी.

आले : रिओ - डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.

तेल : बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणार्याा जाती : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.

जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ - डी - जानिरिओ. 

तंतूचे प्रमाण कमी असणार्यास जाती : जमैका, बँकॉक, चायना. 

आल्यामध्ये प्रचलित अशा प्रमुख जाती मुख्यत: ज्या भागात ते पिकवले जाते, त्या भागाच्या नावावरून ते ओळखले जाते. उदा. 

आसाम : थिंगपुई, जोरहाट, नादिया, थायलंडीयम मरान. 

वेस्ट बेंगॉल : बुर्डवान. 

केरळ : वैनाड स्थानिक, वायनाड, मननतोडी, एरनाड, थोडूपुझा, कुरूप्पमपाडी. 

कर्नाटक : करक्क्ल. 

आंध्रप्रदेश : नरसपटलम 

महाराष्ट्र : रिओ - डी - जानिरिओ, माहीम, स्थानिक, या नावाने ओळखले जाणारे आले घेण्यात येते. तर काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओडी जानरो, चायना, जमेका या जातींचा समावेश होतो. यापैकी प्रमुख जातींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 

१ ) वरदा : ही जात भारतीय मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून १९९६ साली प्रसारित केली आहे. ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात.या जाती प्रति हेक्टरी २२.३ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० % आढळते. या जातीस सरासरी ९ ते १० फुटवे येतात. ही जात रोग व किडीस सहनशील आहे. सुंठेचे प्रमाण या जातीमध्ये २०.०७% आढळते. 

२) महिमा : ही जात सुध्दा कालिकत येथील संशोधन केंद्रातून २००१ साली विकसित करून, प्रसारीत केली आहे. याही जातीला तयार होण्यास २०० दिवस लागतात. या जातीपासून सरासरी प्रती हेक्टरी २३.२ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ३.२६ % असते.

या जातीस सरासरी १२ ते १३ फुटवे येतात. हि जात सुत्रकृमीस प्रतिकारक आहे. सुंठेचे प्रमाण १९ % आढळते.

३) रीजाथा : ही जात मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून २००१ साली प्रसारीत केली आहे. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ४% असून सुगंधी द्रव्याचे प्रमाण सर्वात जास्त २.३६% आहे.

ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात, तर सरासरी उत्पन्न प्रति हेक्टरी २२.४ टन मिळते. या जातीस ८ ते ९ फुटवे येतात. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण २३% आहे.

४) माहीम : ही जात महाराष्ट्रामध्ये प्रचलित असून बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये ही जात लागवडीस योग्य आहे. ही जात मध्यम उंचीची, सरळ वाढणारी आहे. या जातीस ६ ते १२ फुटवे येतात . ही जात तयार होण्यास २१० दिवस लागतात. तर हेक्टरी सरासरी उत्पादन २० टन मिळते. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण १८.७% आहे


SHARE THIS

->"आले (आद्रक) लागवड प्रचलित अशा प्रमुख जाती"

Search engine name