आल्याचे काढणी व बेणे कसे साठवावे


काढणी आणि उत्पादन : आले पीक ७५ टक्के परिपक्क झाल्यानंतर काढणी केली तरी मार्केटला विक्रीसाठी चालते. हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी ६ महिन्यांनी करता येते. आल्याची विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यानंतर पुढे आल्याची काढणी करावी.

बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी. गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आल्याचा पाला कापून गड्डे. बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावे. काढणीनंतर आल्याचे कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत आणि बाजारात पाठवावे.

प्रति हेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १८ ते ३० टनापर्यंत हेते.


द्विहंगामी पीक : अत्तम निचर्यानची जमीन असेल तर हेच आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून आल्याचे द्विहंगामी पीक घेता येते आणि याचे उत्पन्न पहिल्या वर्षापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट ते दुप्पट मिळते आल्याची पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी या पिकास पाणी द्यावे.

साधारणत: अडीच ते तीन महिन्यानंतर पुन्हा नवीन फुटवे फुटु लागतात.

आल्याचे बेणे कसे साठवावे. 
आल्याची लागवड बेण्यापासून कंदापासून करतात, कारण बियापासून लागवड करता येत नाही. आल्याचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी बेणे निरोगी असावे लागते. सामान्यपणे आल्याची काढणी डिसेंबर महिन्यात होते आणि पुढील हंगामातील लागवड एप्रिल - मे महिन्यात होते. तोपर्यंत म्हणजे ४ ते ५ महिने साठवून ठेवावे लागते. या काळात बेण्यातील बाष्पीभवन होऊन बेणे आकसते आणि बुरशीमुळे सडते. परंतु बेण्याची योग्य पद्धतीने साठवण केल्यास ही समस्या राहत नाही. साठवणुकीत बेण्याचे नुकसान होऊ नये म्हणून निरोगी प्लॉटमधून आल्याचे पुर्ण पक्क झालेले कंद निवडावेत.

बेणे साठवण्याची पद्धत : सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्यानत किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात.

बेण्याच्या साठविण्याची पध्दत बेण्याच्या आकारमानाप्रमाणे जमिनीत आवश्यक लांबीचा व रुंदीचा खड्डा खणावा. त्याची खोली मात्र ६० सेंमी ठवावी. ४५ x ४५ x ६० सेंमी आकाराच्या खड्ड्यात २० ते २५ किलो बेणे साठविता येते. खड्ड्याच्या भिंती व तळ शेण व मातीच्या मिश्रणाने सारावाव्यात. त्याप्रमाणे तयार झालेला खड्डा १० ते १५ दिवस वाळू द्यावा.

खड्ड्याच्या तळावर कोरड्या वाळूचा २ सेंमी जाड थर पसरावा. या थरावर बेण्याचा १० सेंमी जाडीचा थर पसरावा. याप्रमाणे बेण्याचा थर व त्यावर वाळूचा थर असे आलटून पालटून खड्ड्यात तळापासून ४५ से ५० सेंमी उंचीपर्यंत थर भरावेत. खड्ड्यावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. ही फळी व बेण्याचा थर यामध्ये १० सेंमी खोल मोकळी जागा ठेवावी. खड्ड्यातील बेण्याला हवा मिळविण्यासाठी फळीला मधे भोक ठेवावे. खड्ड्यावर वाळलेल्या गवताचे छप्पर तयार करावे. त्यामुळे अकाली पावसापासून बेण्याचे संरक्षण होते.


बेण्याची साठवण : बेण्यासाठी ठेवावयाचे आले काढणीनंतर असणार्या् जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी रचून साठवण करावी. परंतु या पद्धतीने वजनामध्ये २५ ते ३० % घट येते. त्यामुळे आले काढल्यानंतर चांगले निवडलेल्या गड्डे बेण्यावर क्किनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. आणि कार्बेन्डेझिम ५० डब्ल्यू पी. १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेवून त्यात १० ते १५ मीटर बुडवावेत, त्यांनतर ते सावलीत सुकवावे.

अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चार खणून किंवा खड्ड्यात केली असता त्याची उगवण क्षमता चांगली राहते. त्यासाठी सावलीत आपल्या बियाण्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या लांबी रुंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.


खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे. याची खात्री करून घ्यावी. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा अगर वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्याची साठवण करावी. खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे व त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे. खड्ड्यातील आले व फळी यामध्ये अंतर सोडावे की जेणेकरून खड्ड्यात हवा खेळती रहावी. अशाप्रकारे साठविलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहते. पत्र्याची सिमेंट, अगर कौलारू बंद खोली बेणे साठवणीसाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यात आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब आलेले आले बेण्यासाठी वापरावे.


आले कंदाचे सरासरी उत्पन्न १५ ते ३० टन प्रती हेक्टर इतके येते. महराष्ट्रात माहिम या जातीचे चांगले उत्पन्न मिळते.
काढणी केल्यानंतर आले पुढीलप्रमाणे करून साठवणूक करता येते.

१) वाळलेले आले 
२) सुंठ 
३) आल्याची पावडर 
वाळलेले आले किंवा सुंठ तयार करावयास वापरावयाचे आले, पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पुर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. त्याचाप्रमाणे सुंठीसाठी वापरावयाचे आले अधिक तंतुमय असू नये, सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओडी जानेरो, माहिम यासारख्या कमी तंतुमय असणार्या  जातीचा वापर करावा. याच्यापासून उत्तम प्रतिची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.


वाळलेले आले : वाळलेले आले तयार करण्यासाठी प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे, ते मुळ विरहित असावे. स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे. दुसर्याा दिवशी त्याच्यावरील साल बाबुंच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी. परत एकदा स्वच्छ पाण्यात आले धुऊन काढावे. हे साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये. तसेच आले सुकविणेसाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा. वाळविताना वरचेवर हात घ्यावा. सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकुन घ्यावे, म्हणजे धुराने काळपट पडणार नाही. आल्यातील पाण्याचा अंश आठ ते दहा टक्क्यापर्यंत कमी आल्यानंतर आले पुर्ण वाळले असे समजावे. पुर्ण वाळल्यानंतर परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले म्हणतात. असे आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे. वाळलेल्या आल्याचे उत्पन्न ओल्या आल्याच्या २० ते २५% इतके असते. हे उत्पन्न आल्याच्या वाणानुसार बदलते.

सुंठ तयार करण्याची मलबार पद्धत : या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले २% चुन्याच्या द्रावणात ६ ते ७ तास भिजत ठेवावे. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवताना बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात थोडक्यात बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. साधारणत: १ किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम याप्रमाणात गंधक जाळावे. त्यानंतर कंद बाहेर काढून २% चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सुर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० % राहीपर्यंत वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.


सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : या पध्दतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर १.५ x २ फूट आकाराचा हाताने उचलेल इतक्या क्षमतेचा गॅल्वनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सोडीयम हयाड्राऑक्साईड (कॉस्टीकसोडा) ची २०%, २५% आणि ५०% तिव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २०% द्रावणामध्ये पाच मिनीटे, २५% द्रावणमध्ये एक मिनीट आणि ५०% द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४% सायट्रीक अॅसिडच्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. या पध्दतीने तयार केलेल्या सुंठेला बाहेरच्या देशात चांगली मागणी असते. कारण मलबार पध्दतीने तयार केलेल्या सुंठेत कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.


आल्याची पावडर : चांगले वाळलेले आले घेवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळीणीमधून चाळून हवा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरीचा मुख्य उपयोग ओलीओरेझीन तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.


आद्रकाची साल काढण्यासाठी लागणारी उपकरणे: प्रक्रिया करून विविध पदार्थात वापर करण्यासाठी आद्रकाची साल काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आद्रक रात्रभर पाण्यात भिजवून काढल्यानंतर त्याची साल थोडीशी ढिली होते व काढून टाकण्यास फारसे कष्ट पडत नाहीत व त्यासोबत गराचा अंशही खरवडला जात नाही. साल काढण्यासाठी बांबूची धारदार सुरी किंवा स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरतात. तसेच शिंपले किंवा कोरड्या स्वच्छ खरबडीत कापडासही घासून साल काढतात. यानंतर स्वच्छ धुवून आद्रक ३ ते ४ दिवस कडक उन्हात वाळवितात. वाळलेल्या आद्रकाची पावडर तयार करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी ती वापरतात.


भारतातील आल्याचे क्षेत्र, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा तक्ता (क्र. १)  
वर्ष  
क्षेत्र (००० हेक्टर)  
एकूण उत्पादन
(
००० टन)  
एकूण उत्पादन
(
किलो / हे.)  
१९९७ - ९८  
७५ .६  
२५२.१  
,३३५  
१९९८ - ९९  
७७.६  
२६३.२  
,३९२  
१९९९ - २०००  
८०.८  
२८२.६  
,४९८  
२००० -०१  
८६.२  
२८८.०  
,३४१  
२००१ -०२  
९०.८  
३१८.०  
,५०२  
२००२-०३  
९०.८  
३१७.०  
,५००  
२००३ - ०४  
८५.१  
३०१.९  
,५४८  
२००४-०५  
९५.३  
३५९.०  
,७६७  
२००५-०६  
११०.६  
३९१.०  
,५३७  
२००६-०७  
१०५.९  
३७०.०  
,४९७  



जगात सर्वात जास्त क्षेत्र म्हणजे अंदाजे जगाज्या एकूण आले लागवडीच्या क्षेत्रापैकी ५५ % क्षेत्र हे एकट्या नायजरीयाचे आहे. जगाचे आल्याचे २००७ मधील एकूण उत्पादन १३,८७,४४५ मेट्रिक टन होते. भारताचे उत्पादन हे जगाच्या ३६% होते, तथापि अमेरिकेच्या तुलनेत ही उत्पादकता फार नगण्य आहे.

जागतिक व्यापार हा साधारण १९ कोटी डॉंलरचा आहे. यामध्ये भारताचा वाटा फक्त ६% आहे. चीनचा वाटा हा ५७% आहे. परंतु आल्याच्या तेल आणि अर्काच्या व्यापारात निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा सरस असून तो ५० % आहे.

जगातील आल्याचे क्षेत्र व एकून उत्पादन (तक्ता क्र.२) 
वर्ष  
क्षेत्र
(
००० हेक्टर)  
उत्पादन
(
मेट्रीक टन)  
१९९८ 
३१२,१०८  
८६४,७६०  
१९९९  
३०८,६३१  
९५२,२२२  
२०००  
३०५,६९६  
९५३,१५२  
२००१  
३१०,९२३  
९८८,९५१  
२००२  
३१७,०९९  
,००७,५०३  
२००३  
३४१,३६०  
,१०९,८३३  
२००४  
३४१,८२९  
,१४१,३१९  
२००५  
३७२,२७१  
,२६४,८९१  
२००६  
४१४,१८३  
,३३७,१८८  
२००७  
४२९,४८१  
,३८७,४४५  


जगभरातून आल्याची निर्यात (तक्ता क्र. ३)  
वर्षं  
एकूण निर्यात
(
टन)  
किंमत (०००)  
१९९७ -९८  
,७४,१८५  
१४२,३१५  
१९९८ - ९९  
१५५,९८५  
१०७,७८९  
१९९९ -२०००  
२०४,०५५  
१२२,०८४  
२००० -०१  
२४३,१७३  
१३१,६३२  
२००२ -०३  
२९०,९९२  
१२५,९२२  
२००३ -०४  
३११,४०५  
१३५,६०३  
२००४ - २००५  
२९१,४८४  
२७७,६१९  
२००५ -०६  
३७९,६३०  
३१९,४८७  
२००६ -०७  
३८५,४०६  
२५३,०९१  


प्रक्रिया केलेले आणि न प्रक्रिया केलेले (Bleached/ Unbleached), स्वच्छ आणि अस्वच्छ (Garabled / Ungarbled) तसेच तुकडा झालेले अशा आल्याचा जागतिक मार्केटमध्ये ५०% वाटा आहे. कोचिंग आले हे जगप्रसिद्ध आहे. जागतिक मार्केटमध्ये आल्याचि भरतातून ३ लाख टन निर्यात केली जाते.

भारतातील आल्याची एकूण निर्यातीची आकडेवारी (तक्ता क्र. ४)  
वर्ष  
एकूण निर्यात
(
टन)  
किंमत
(
लाख रू.)  
१९९७ - १८  
२८,२६८  
,२६२.७३ 
१९९८ -९९  
,६८३  
,०५८.3२  
१९९९ - २०००  
,९२३  
,२५३.५५  
२००० - ०१  
,२८८  
,६८२.०५  
२००१ -०२  
,४६४  
,३११.४७  
२००२ - ०३  
,४६१  
,३११.४७  
२००३ -०४  
,०००  
,३४०.५०  
२००४ -०५  
१४,९०८.१३  
,९२९.४०  
२००५ -०६  
१०,८९०.४३  
,५८०.५९  
२००६ - ०७  
,६६१.३४  
,७७७.७७  
२००७ - ०८  
,३३२.९१  
,२९६.०८  
२००८ - ०९  
,२२९.७०  
,५८१.७५  







SHARE THIS

->"आल्याचे काढणी व बेणे कसे साठवावे"

Search engine name