आले लागवडीवरी रोग नियंत्रण कसे करावे


१) कंदकूज : आले तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त परमाणात दिसून येतो. प्रथम पानांच्या शेंड्यावरून व कडांनी पिवळे पडून झाड खालीपर्यंत वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाणा वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथीयम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमिन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्याचची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेवून पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८ टक्के + मॅकोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करवी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून घ्यावा. 

२) पानावरील ठिपके : या रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो. या रोगामध्ये असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येवून संपूर्ण पान करपते.

याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्रॅम किंवा बाविस्टीन १० लिटर पाण्यात १० ते १५ ग्रॅम किंवा १ टक्के बोडोंमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या करव्यात. वरील औषधांच्या आलटून- पालटून फवारण्या कराव्यात एकच औषध सतत फवारणीसाठी वापरू नये.

फवारणी : वरील सर्व किडी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि उत्पादन अधिक व दर्जेदार मिळावे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (बेणे उगवल्यानंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (७५ ते ९० दिवसांनी ) : थ्राईवर ६०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० ते ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौठी फवारणी : (१२० दिवसांनी ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० ते ६०० मिली + ३०० लि. पाणी.

आल्याची काढणी करेपर्यंत दर महिन्याला फवारणी क्र. ४ प्रमाणे फवारणी करावी. म्हणजे आल्याच्या फण्यांची फुगवण,वाढ चांगली होऊन दर्जात वाढ होते. तसेच आले लागू नये याकरीता दर महिन्याला जर्मिनेटर १ लि. आणि कॉपरऑक्झीक्लोराईड १ किलो + हार्मोनी ५०० मिली प्रति एकरी २००लि. पाण्यातून सोडावे.

हवामानातील फेरबदल, पाणी, खतांचे नियोजन आल्याच्या लागवडीचा हेतू (मार्केट, बेणे, प्रक्रिया उद्योग इत्यादी) लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क करून तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच सर्व व आवश्यक असल्यास पुढील अधिक अथवा कमी जास्त फवारण्यात घ्याव्यात कारण आले हे पीक साधरण १२ ते १८ महिने जमिनीत राहते.

SHARE THIS

->"आले लागवडीवरी रोग नियंत्रण कसे करावे"

Search engine name