पुढारीच्या मागे लागून अनमोल वेळ वाया घालवू नका!!


सध्य स्थिति :
मी पूर्ण महाराष्ट्र फिरतोय अनेक भागात वेगवेगळ्या टोपण नावाने पुढारी आहेत, उदा. नाना, दादा, काका, दादासाहेब, तात्या, भाऊ, अशी अनेक प्रत्येक पुढार्यांळच्या मागे ही तरुण मुल आपला कामधंदा, व्यवसाय, करिअर सोडून फिरताना दिसतायत. 


ऐन तरुणपणातला वेळ अक्ष:रशहा वाया घालवतात, त्याचे वय २१ ते ३० या वयातील मुलांना एक दिवस ही वेळ घालवणे परवडणारे नाही, मित्र हो जेव्हा तुमच्या आयुष्यातील वेळ हा वाया जाईल, तेव्हा वय वाढत जाईल, लग्नाचे वय जवळ येईल कमाई नाही तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल, ऊसाच्या घाण्यात जसे ऊस गाळून रस काढला जातो व शेवटी चिपाड राहते, त्या चिपाडाप्रमाणे तुमची अवस्था झालेली असेल, शेवटी आयुष्यात भीक मागण्याची वेळ येईल.

 तुम्ही हिर्या्सारखे व्हा, काचेसारखे नको!
 

काच आणि हिरा ह्यातील फरक सर्वांनाच माहीत आहे, काच म्हणजे स्वस्त वस्तू सर्वसामान्य माणसासारखी तर हिरा म्हणजे खूप मूल्य असणारी मोठ्या व्यक्तीसारखी, पण एखादी व्यक्ती हिरा म्हणजे मोठी का होते किवा एखादा समाज श्रीमंत व यशस्वी का होतो.



SHARE THIS

->"पुढारीच्या मागे लागून अनमोल वेळ वाया घालवू नका!!"

Search engine name