Lets Up Inspire ’कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’उत्तर’ (भाग-1)



*Lets Up Inspire Katta*

आयुष्यात स्वप्नवत वाटणाऱ्या कित्येक गोष्टी सत्यात उतरवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकांत आहे. याची असंख्य उदाहरणे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. काही लोक तर त्यांच्याकडे असलेल्या दुर्बलेतवर मात करुन विजयी होतात. त्यांना हवे ते साध्य करतात. आपल्याकडे असणाऱ्या उणीवेवर मात करत यशस्वी झालेल्या लोकांची उदाहरणे आपल्याला नेहमीच प्रेरित करत असतात. वेळोवेळी ’कारणं’ देवून पळ काढणाऱ्यांसाठी अतिशय चपखल ’उत्तर’देणारी हि उदाहरणं आहेत... 

*कारणं* : माझ्याकडे पैसे नाहीत?

_*उत्तर*_ : इन्फोसिस कंपनीच्या नारायण मुर्तींकडे सुरूवातीच्या काळात पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून कंपनी सुरु केली होती.

*WhatsApp वर झटपट अपडेट राहण्यासाठी जॉईन करा

  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन FREE, जॉईन करण्यासाठी क्लिक करा*

 
*कारणं*_ :  मी गरीब आहे, माझा जन्म खेड्यात झाला.

_*उत्तर*_ :  माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम एका गरीब घरात जन्माला आले होते. पुढे जाऊन त्यांनी केलेलं महान कार्य सर्वानांच माहित आहे.

*कारणं*_ :  मी बऱ्याच वेळा अपयशी झालो आता प्रयत्न करण्याची हिंमत नाही.

*उत्तर*_ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधी पंधरा वेळा निवडणूक हरले होते.

*कारणं*_ :  माझा चेहरा सुंदर नाही.

*उत्तर*_ :  अभिनेते नाना पाटेकर व मिथुन चक्रवर्ती हे चित्रपटाचे नायक दिसत नाहीत. त्यांचे चेहरे त्यासारखे नाहीत. मात्र त्यांनी हिरो म्हणून केलेल्या भूमिका व त्यांचे यश आपल्याला माहित आहेच.

*कारणं*_ :  माझे शिक्षण कमी आहे.

*उत्तर*_ :  महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे शिक्षण फारच कमी होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यलेखनात फार मोठे कार्य केले. त्यांना केवळ तीन दिवस शाळेत जाता आले होते. बहिणाबाई चौधरी यांना अक्षरओळख सुध्दा नव्हती.

*कारणं*_ :  मी दिवाळखोरीत निघालो आहे, माझ्यावर कोण विश्वास ठेवणार?

*उत्तर*_ :  प्रसिध्द उद्योजक व फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड त्यांच्या आयुष्यात सातवेळा दिवाळखोर झाले होते. जगातील सर्वात मोठी कोल्ड्रिंक कंपनी पेप्सीको दोनदा दिवाळखोरीत निघाली होती.


*कारणं*_ :  माझे वय कमी आहे.

*उत्तर*_ :  शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याची सुरूवात अतिशय कमी वयात केली होती. सचिन तेंडूलकरने अतिशय कमी वयात भारतीय संघात पदार्पण केले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचे वय 21 वर्षाचे होते.

*कारणं*_ :  माझे वय जास्त आहे, मी म्हातारा झालो.

*उत्तर*_ :  अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 55 व्या वर्षी नव्याने करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर परत ते यशाच्या शिखरावर पोहोचले. हर्लंड सँडर्सनी वयाच्या साठीनंतर केएफसी (केंटुकी फ्राईड चिकन) सुरु करुन जगभरात त्याचा विस्तार केला.

वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते. ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारची माणसे यशस्वी होतात. ती शक्ती निसर्गाने त्यांना दिलेली आहे. त्या शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.
 

*‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*  *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर


SHARE THIS

->"Lets Up Inspire ’कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’उत्तर’ (भाग-1)"

Search engine name