बांधकाम संबंधी विविध दाखले व परवाने Various construction certificates and permits


बांधकाम संबंधी विविध दाखले व परवाने
बिल्डर व नागरिकांना बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र व इतर परवाने घेण्यासाठी महापालिकेतील बांधकाम विभागाकडे जावे लागते.
* बांधकाम परवानगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. प्लॉटचा ७/१२ उतारा किंवा मालमत्ता पत्रक ६ महिन्याच्या आतील

२. अनुक्रमणिका

३. कार्यालयीन उपयोगासाठी कोरे कागद

४. विभाजक

५. मालकाच्या सहीचे आवेदन पत्र (अर्ज) परिशिष्ट अ

६. परिशिष्ट अ – नमुना

७. परिशिष्ट ब – पर्यवेक्षणाचा (आर्की.इंजिनिअर यांनी भरलेला व सही केलेला)

८. फॉर्म – अे – 3.3 (विकास शुल्क / निधीसाठी)

९. पैसे भरल्याच्या पावत्या लावणेसाठी कोरा कागद

१०. मालकी हक्कासंबंधी कागदपत्र 7/12 उतारा / सी.टी.एस. उतारा/ खरेदीखताची प्रमाणीत प्रत / ज.मु.पत्राची नोंदणी केलेली व प्रमाणित केलेली प्रत.

११. प्लास्टीक फोल्डर (नकाशासाठी) प्रस्तावित बांधकाम नकाशा.

१२. सी.टी.एस./ टी. आय.एल.आर./ यु.एस.सी. नकाशा

१३. अंतिम मंजुर लेआउटची प्रमाणित खरी नक्कल / सी.टी.एस./ टी.आय.एल.आर./ यु.एल.सी.नकाशा

१४. अंतिम मंजुर लेआउट पत्राची खरी नक्कल / तात्पुरत्या मंजुर लेआउट / 31/12/85 पावेतो

१५. बिनशेती परवानगी खरी नक्कल

१६. चालुवर्षीचा बिनशेती सारा भरलेची पावतीची खरी नक्कल

१७. ना.ज.क्र.म. कार्यालयाकडील ना हरकत दाखला

१८. वाढीव बांधकामासाठी अ) अस्तित्वातील बांधकामाचा नकाशा ब) भोगवटाप्रमाणपत्राची खरी नक्कल क) चालु पाणीपट्टी व घरपट्टी भरलेची पावतीची खरी नक्कल

१९. नोंदणी केलेली जनरल मुखत्यारपत्राची प्रमाणीत प्रत.

२०. 50/- रू. च्या रेव्हेन्यु स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र.

२१. 200/- रू. च्या रेव्हेन्यु स्टॅम्पवर इंडग्नीटी बॉण्ड

२२. स्ट्रक्चरल स्टॅबीलीटी सर्टीफिकेट

२३. आर्कि./ इंजी. व स्ट्रक्चरल इंजि. यांचे परवान्याची कॉपी

२४. तपासणी फी भरलेची पावती

२५. विकास निधी / शुल्क भरलेची पावती

२६. डेब्रीज मटेरिअल हमीपत्र

२७. एल.बी.टी. हमीपत्र (नोटरी)


* बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी कामी आवश्यक कागदपत्रे :-

१. मनपा कव्हर

२. अनुक्रमणिका

३. कोरे कागद (कार्यालयीन उपयोगासाठी)

४. विभाजक

५. विहीत नमुन्यातील अर्ज

६. बांधकाम पुर्णत्वाचे इंजि./ वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र

७. चटई क्षेत्र तक्ता (दोन प्रतित)

८. बांधकाम पुर्ण झाल्याचा नकाशा वास्तुविशारद / इंजि. यांनी स्वाक्षरी केलेल्या (दोन प्रतित)

९. कोरे कागद (पावत्या चिटकविण्यासाठी)

१०. मालकी हक्कासंबंधीचे कागदपत्र – 7/12 चा उतारा/ सीटी सर्व्हेचा उतारा/ प्रमाणीत केलेली खरेदीखताची नक्कल प्रत

११. मंजुर नकाशाची मुळ प्रत

१२. बांधकाम परवाना आदेशाची प्रमाणित प्रत व त्यातील शर्तींची पुर्तता

१३. बिनशेती कर भरलेची प्रमाणित प्रत

१४. भागश: पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी हमीपत्र

१५. ज्योत्याचे पुर्णत्वाचा दाखला

१६. मोकळा भुखंड निधी (व्हॅकन्ट प्लॉट टॅक्स)

१७. कंम्प्लीशन नकाशा


* बांधकाम परवानगी मिळ्ण्यासाठी किमान भुखंड :-

बांधकाम परवानगी मिळण्यासाठी किमान भूखंड मर्यादा दोन प्रकारात

१. गावठाण/ दाटवस्तीसाठी किमान २०चौ. मी. / २१५ चौ. फुट

२. बिगर गावठाण किमान ५० चौ. मी. / ५३८ चौ फुट


* मनपा क्षेत्रामध्ये भूखंडाचे चटईक्षेत्र निर्देशांक :-

१. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार रहिवासी व वाणिज्य कारणासाठी संमिश्र दर्शविलेल्या क्षेत्रासाठी १ व दाटीवाटीच्या क्षेत्रात (गावठाण) भागात २ चटई क्षेत्र निर्देशांक.

२. औदयोगिक क्षेत्रासाठी १ चटई क्षेत्र निर्देशांक.


* जोते (प्लिंथ) तपासणी दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. मंजुर नकाशाची प्रत व मंजुरीचे पत्र

२. आर्किटेक्ट / इंजिनिअरचा दाखला

३. प्लिंथच्या नकाशाच्या दोन प्रती

४. 7/12 उतारा (नविन)

५. पेपर नोटीसची प्रत

६. जागेवरील नावाचा बोर्डचा फोटो


* नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी कागदपत्रे :-

१. नळ-कनेक्शनचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज.

२. मिळकत-कर भरल्याची पावती किंवा अर्ज केल्याची तारीख

३. मिळकतीचा स्थळदर्शक नकाशा.

४. बांधकाम चालू करण्याचा / बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला/पूर्णत्वाचा दाखला मिळावा यासाठी केलेल्या अर्जाची प्रत.

५. विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.


* ड्रेनेज विभागाची एन.ओ.सी. साठी आवश्यक कागदपत्रे :-

१. विहीत नमुन्यातील अर्ज

२. बांधकाम पुर्णत्वाचे इंजि./ वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र

३. चटई क्षेत्र तक्ता (दोन प्रतित)

४. बांधकाम पुर्ण झाल्याचा नकाशा वास्तुविशारद / इंजि. यांनी स्वाक्षरी केलेल्या (दोन प्रतित)

५. कोरे कागद (पावत्या चिटकविण्यासाठी)

६. मालकी हक्कासंबंधीचे कागदपत्र – 7/12 चा उतारा/ सीटी सर्व्हेचा उतारा/ प्रमाणीत केलेली खरेदीखताची नक्कल प्रत

७. मंजुर नकाशाची मुळ प्रत

८. बांधकाम परवाना आदेशाची प्रमाणित प्रत व त्यातील शर्तींची पुर्तता

९. बिनशेती कर भरलेची प्रमाणित प्रत

१०. भागश: पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी हमीपत्र

११. ज्योत्याचे पुर्णत्वाचा दाखला


मोकळा भुखंड निधी (व्हॅकन्ट प्लॉट टॅक्स)

* विकास योजना अभिप्राय अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे :-

१. शासकीय मोजणी नकाशा - सहा महिन्याच्या आतील

२. ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा नजीकच्या तारखेचा मूळ प्रतीत

३. मोजणी नकाशाच्या दोन ब्लू प्रिंट

* विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे :-

१. अर्ज 7/12 उतारा व फी भरलेची पावती व आवश्यकता असल्यास अधिकृत मोजणी नकाशा.


* ले-आऊट मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे :-

१. ७/१२ उतारा चालू तारखेची (मूळ प्रत )

२. कुलमुखत्यार पत्र किंवा खरेदी खत.

३. आय बॉण्ड व ऍफेडेव्हिट नमुन्यानुसार नोटरीसह

४. मोकळ्या जागेची कर भरल्याची पावती

५. जागेची मोजणी नकाशा

६. झोन दाखल (झोनिंग डिमार्केशन नगरपालिका किंवा म.न.पा. यांचेकडून)

७. यु.एल.सी. ना हरकत दाखला किंवा यु.एल.सी. ऑर्डर (जागा दहा गुंठ्यापेक्षा जास्त असल्यास )

८. ले-आऊट नकाशा चार प्रतिंमध्ये (नियोजित तयार केलेले)

९. आर्किटेक्ट / इंजिनिअर यांचे लायसन्स प्रत

१०. एम.आर.ठी.पी व सुपरव्हीजन फॉर्म



वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल करून ले-आऊट संबंधित नगरपालिका किंवा म.न.पा. कडून मान्यता मिळविता येते.



SHARE THIS

->"बांधकाम संबंधी विविध दाखले व परवाने Various construction certificates and permits"

Search engine name