व्यवसायकरिता जाहिरातीचे महत्व Importance of advertising for Businessव्यवसायकरिता जाहिरातीचे महत्व 

दोन प्रकारच्या खरेदी -विक्री असतात .

1) Low Ticket खरेदी विक्री .

2) High Ticket खरेदी विक्री .


मराठीत सांगायचं तर "लहान व्यवहार आणि मोठा व्यव्हार" 

📌भाजीपाला खरेदी - किराणा सामान खरेदी हे झाले लहान व्यव्हार .

📌जमीन - जुमला खरेदी / लग्नाच्या सामानाची खरेदी / दागिने खरेदी हा प्रकार म्हणजे मोठा व्यव्हार असतो .


लहान खरेदी आपण कोणाकडूनही करू शकतो : त्याला काही विशेष ब्रान्ड / व्यक्तीच / दुकानच हवंय असं काही नसतं पण मोठा व्यव्हार असा सहज सहज होत नसतो तो होण्यासाठी ग्राहकाला तुम्ही अन तुमची इमेज पटलीच पाहिजे .


तर विषय असा होता : कि मी काल परवा नाशिक वरून येवला मार्गे छत्रपती संभाजीनगरला येत असताना एका पैठणी ब्रान्डचे वॉल पेंटिंग दिसायला लागले.

त्यांनी येवला 30 - 40 किमी असतानापासून असे होर्डिंग लावलेले होते अन वॉल पेंटिंग केलेल्या होत्या.

या रहत्त्यावरून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पुर्ण रस्ता भर यांचंच नाव तोंडपाठ होईल इतकी मार्केटिंग .

मी विचार केला कि येवल्यात शेकडो पैठणी उत्पादक असतील मग त्यांनी हेच काम का केलं नसावं ?


पण जसं जस येवला जवळ येऊ लागलं तस तसे इतर पैठणी उत्पादकांचे काही नवे / काही जुने / काही खुपच जुने बोर्ड दिसायला लागले .

येवल्यात मात्र खुप साऱ्या लोकांचे बोर्ड बघायला मिळाले .

आता प्रश्न असा कि कोणत्या पैठणी ब्रान्डचा परिणाम जास्त काळ बघणाऱ्याच्या मनावर होईल ?


obviously ज्याने जास्त काळ नागरिकांच्या डोळ्यासमोर स्वतःला प्रेझेंट केलं? त्याचाच परिणाम जास्त होणार कारण ? तशा प्रकारे ग्राहकांची conditioning झालीये .

जो हा विचार करेल कि केवळ येवल्यात काही ठिकाणी पोस्टर चिपकावुन काम भागवु त्याना कमी प्रमाणात ग्राहक मिळणार हे सरळ आहे.

तात्पर्य : मित्रानो तुम्ही जरी एखाद्या प्रसिद्ध शहरातला प्रसिद्ध item विकत असला ? तरिही अशाप्रकारे hording ,wall painting वगैरेचा मोठा  वापर करावा .

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणापासून दुरपर्यत देखील जाहिराती कराव्या जेणेकरून एक impact तयार होईल .


🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना.....


SHARE THIS

->"व्यवसायकरिता जाहिरातीचे महत्व Importance of advertising for Business"

Search engine name